'बिग बॉस 19'च्या घरात फरहाना भट्ट अशनूरला टिव्ही इंडस्ट्रीवरून बोलते.
फरहाना भट्टच्या वक्तव्यावर हिना खान खूप भडकते.
हिना खान फरहाना भट्टला सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले सुनावते.
'बिग बॉस 19'च्या घरात दिवसेंदिवस वाद वाढताना दिसत आहेत. 'बिग बॉस 19'चा गेम प्रेक्षक खूप उत्सुकतेने पाहतात आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देखील देतात. शोमध्ये गेम सोबतच सदस्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल, करिअरबद्दल बोले जाते. त्यामुळे अनेक वाद देखील होतात. अशीच एक गोष्ट आता 'बिग बॉस 19'च्या घरात झाली आहे.
नुकतचा 'बिग बॉस 19'च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. टास्कमध्ये दोन सदस्य 19 मिनिटांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. तेव्हा घरातील इतर सदस्य त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अशनूर आणि अभिषेक बजाज बसलेले असतात. तेव्हा फरहाना भट्ट अशनूरचे लक्ष विचलित करण्यासाठी असे काही बोलते की जे ऐकून हिना खान (Hina Khan) भडकते. हिना खान ही टिव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. ती स्वतः 'बिग बॉस 11'चा भाग होती.
हिना खान काय म्हणाली?
"भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात मोठा रिॲलिटी शो INOX मध्ये प्रदर्शित झाला होतो का?
मेरे हसब से ते टेलिव्हिजन पे ही आता है..
हैना?
बरं, हमारे टेलीव्हिजन का दिल ही इतना बड़ा है की कोई भी स्टार बन जाता है..
मला बोलायला भाग पाडू नको....
आम्ही कोणत्याही माध्यमात चांगले काम करण्यास प्राधान्य देतो आणि आम्ही सर्व माध्यमांचा आदर करतो. जे कोणत्याही माध्यामातील अनुभवी कलाकार करणार नाही. खाली बर्तानो से सिरफ शोर आता है...टिव्हीचा अपमान करण्याची हिंमत करू नकोस ..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.