काजल अग्रवालच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे.
काजल अग्रवालने मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.
काजल अग्रवालने सोशल मीडियावर मृत्यूच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.
साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal ) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. काजल अग्रवालचे निधन झाले असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली. काजलचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. आता या अफवा खोट्या असल्याचे स्वतः अभिनेत्रीने सांगितले आहे.
सोमवारी रात्री काजल अग्रवालचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी पसरली. ती गंभीर गंभीर अपघातात जखमी झाली असे बोले गेले. मात्र आता काजल अग्रवालने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून खोट्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तिने पोस्टमध्ये तिच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.तसेच ती सुरक्षित असल्याचे सांगितले. काजल अग्रवाल पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
"मी माझा अपघात झाल्याच्या काही खोट्या बातम्या ऐकल्या आहेत. खरे सांगायचे तर, या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. देवाच्या कृपेने मी ठीक आहे. सुरक्षित आहे. मी तुम्हाला विनंती करते की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पसरवू नका.आपण सकारात्मक दृष्टी आणि सत्यावर आपले लक्ष केंद्रित करूया."
काजल अग्रवालने आजवर अनेक हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. अलिकडेच काजल 'कन्नप्पा' आणि 'सिकंदर' चित्रपटात झळकली आहे. तसेच काजल आता रणबूर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच काजल अग्रवाल तिच्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसली. तिने मालदीव ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.