Ganesh Visrajan : विसर्जनाहून परतताना अपघात, रील स्टारचा जागीच मृत्यू; विसर्जनाची 'ती' रील ठरली शेवटची

Dhule Reel Star Death : गणेश मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर परत येत असताना एका रील स्टारचा अपघात झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर घडली.
ganesh visarjan
ganesh visarjanx
Published On
Summary
  • धुळेतील रील स्टार शुभम संघवीचा गणेश विसर्जनानंतर मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला.

  • विसर्जनावेळी बनवलेला त्याने बनवलेला रील व्हिडीओ हा आयुष्यातला शेवटचा रील ठरला.

  • या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भूषण अहिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dhule : धुळे शहरातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील रील स्टारचा गणरायाचे विसर्जन करून परतत असताना दुर्दैवी अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. गणपत्ती बाप्पाला विसर्जित करतानाचा रील स्टार शुभम संघवीने बनवलेला रील व्हिडीओ हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा रील बनला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील शुभम संघवी याचा रील स्टार तापी नदी पात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करुन परतताना भीषण अपघातात मृत्यू झाला. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातामध्ये शुभमचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ganesh visarjan
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी डावललं, कोळी बांधवांचा आरोप; मंडळाकडून मोठं वक्तव्य, सांगितलं...

धुळे शहरातील सर्व मोठ्या गणपती मंडळांमधील गणेश मूर्त्यांचे तापी नदी पात्रात रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात येत असते. विसर्जनासाठी शुभम संघवी हा तापी नदी पात्राजवळ गेला होता. गणरायाच्या विसर्जनानंतर परत येत असताना मोटारसायकलचा अपघात झाल्याने रील स्टार शुभम संघवीचा जागेवरच मृत्यू झाला.

ganesh visarjan
Ganpati visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्येचा थरार, तरुणावर चाकूने वार; घटनेचा Video Viral

पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोहन नगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली. मिरवणूक यात्रा सुरु असताना विजेचा शॉक लागल्याने प्रवीण राजेंद्र कुटे आणि अमोल सदाशिव चव्हाण गंभीर हे दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ganesh visarjan
Prime Minister Resign : पंतप्रधानांचा राजीनामा, सत्ताधारी पक्षात फूट पडू नये म्हणून घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com