
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देणार.
जुलै निवडणुकीतील पराभवानंतर एलडीपी युतीने बहुमत गमावले.
संध्याकाळी ६ वाजता इशिबा पत्रकार परिषदेत घोषणा करणार.
PM Resign : सत्ताधारी पक्षामध्ये फूट पडू नये यासाठी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा देण्याता निर्णय घेतला आहे. जपानी सार्वजनिक प्रसारक एनएचकेने ही माहिती दिली आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता इशिबा पत्रकार परिषद घेतील आणि त्यामध्ये ते राजीनामा संबंधित घोषणा करतील असे म्हटले जात आहे.
सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षामध्ये फूट पडू नये म्हणून जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील नेतृत्त्वाची निवडणूक घ्यायची की नाही याचा निर्णय लवकरच घेतला जाणार होता. पक्षात अविश्वास ठराव आणण्याआधीच इशिबा राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील संसदीय निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी पक्षात वाढू लागल्यानंतर शिगेरू इशिबा यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत एलडीपी आणि त्यांचा मित्रपक्ष कोमेइतो यांनी खालच्या सभागृहामध्ये बहुमत गमावले होते. वरच्या सभागृहात बहुमत टिकवण्यात ही युती अपयशी ठरली. यामुळे सरकारची स्थिरता धोक्यात आली.
जपानच्या दोन्ही सभागृहामध्ये बहुमत न मिळाल्याने एलडीपी पक्षाच्या युतीला मोठे धक्के बसले. बहुमत गमावल्यानंतरही शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधानपदी राहण्याची शपथ घेतली होती. ऑक्टोबरमध्ये पदभार स्वीकारलेल्या इशिबांनी महिन्याभराहून अधिक काळ पक्षातील उजव्या विचारसरणीच्या गटाच्या मागण्यांना विरोध केला होता, अशी माहिती क्योडो न्यूजने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.