Pune : पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर, NCP नगरसेवकाच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून

Pune Shocking : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर झाल्याचे उघडकीस आले आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Pune
Punesaam tv
Published On
Summary
  • गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर

  • पुण्यातील नाना पेठेत एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्या

  • गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

  • राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : अनंत चतुदर्शीची तयारी सुरु असताना पुण्यात गँगवॉर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील नाना पेठेमध्ये एका तरुणावर ३ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळीबारामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना एका वर्षापूर्वीच्या नगरसेवकाच्या खुनाच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर झाले आहे. नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकरचा खून झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसराच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Pune
Maharashtra : नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, समर्थकांनी हल्लेखोरांचे घर फोडले, कार जाळली

नाना पेठेत झालेल्या गोळीबारामध्ये हल्लेखोरांनी तरुणावर तीन गोळ्या झाडल्या. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळ्या झाडून खून झालेला तरुण हा गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासकार्य सुरु करण्यात आले.

Pune
Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा धक्का, १५ वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या नेत्याने दिला राजीनामा

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात गणेश कोमकर हा आरोपी आहे. या गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकरचा गोळीबारात खून झाल्याचे समोर आले आहे. गणेश विसर्जनाला काही तास शिल्लक असताना गोळीबारामुळे पुणे शहर आणि आसपास मोठी खळबळ उडाली आहे.

Pune
Ajit Pawar : आधी IPS अंजना कृष्णा यांना फोनवरून झापलं, आता ट्विटमधून अजितदादांनी विषयच संपवला, म्हणाले- माझा उद्देश...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com