Building Collapsed : मुंब्र्यात मध्यरात्री दुर्घटना, २५ वर्ष इमारतीचा सज्जा कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

Building Crash in Thane: ठाण्यातील मुंब्रा येथे २५ वर्ष जुनी इमारतीचा काही भाग कोसळून वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला आहे. एक महिला जखमी असून रहिवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारत खाली करण्यात आली आहे.
Building Collapsed in Thane
Building Collapsed in ThaneSaam Tv
Published On
Summary
  • मुंब्र्यात २५ वर्ष जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून वृद्ध महिलेला मृत्यू

  • एक महिला जखमी असून तिच्यावर उपचार सुरू

  • इमारत तातडीने रिकामी करून सील करण्यात आली

  • सलग दुर्घटनांनी उपनगरांतील जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

काही दिवसांपूर्वी विरार येथे १० वर्ष जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १५ हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर काल रात्री ठाण्यातील मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड येथील २५ वर्ष जुनी इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत वृद्धमहिलेचा मृत्यू झाला आहे. घटना घडताच क्षणी बचाव पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केलं आहे.

मुंब्रातील लकी कंपाऊंडमधील डी विंग ग्राउंड प्लस तीन मजली इमारत ही २५ वर्ष जुनी असून, तिच्या टेरेसवर अतिरिक्त बांधकाम करण्यात आले होते. रात्री अचानक टेरेसवरील रूम नंबर ४०४ चा सज्जा खाली कोसळला. त्यावेळी इमारतीच्या बाजूने जात असलेल्या इलमा जेहरा जमाली (२६) आणि नाहीद जैनउद्दीन जमाली (६२) या दोन महिलांवर मलबा कोसळला. गंभीर जखमी झालेल्या दोघींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

Building Collapsed in Thane
Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

इलमा यांना काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर नाहीद यांना बिलाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्घटनेनंतर सदर इमारत रिकामी करण्यात आली असून नागरिकांनी आपली राहण्याची व्यवस्था नातेवाईंकाकडे केली आहे. दरम्यान या इमारतीला सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Building Collapsed in Thane
Mumbra Waterfall: ठाणे जिल्ह्यात उंच डोंगरातून वाहतोय 'मुंब्रा धबधबा', पर्यटकांची पाऊस पडताच झाली गर्दी

या घटनेमुळे मुंब्रा परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी विरारमध्ये घडलेला भीषण अपघात, आता मुंब्र्यातील ही दुर्घटना या सलग घटनांमुळे मुंबई व उपनगरांमधील जुन्या, जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.

Building Collapsed in Thane
Mumbra Station : मुंब्रा स्टेशनचं नाव कसं पडलं? जाणून घ्या मोठा इतिहास

विरारमध्ये काय घडलं होत ?

विरारमधील नारंगी फाटा परिसरात असलेली रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची ४ मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. ही घटना रात्री उशिरा घडली. आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य केले. या बचावकार्यात १७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ९ जण जखमी सापडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com