Shah Rukh Khan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर शाहरूखचा बॉडीगार्ड चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

Shah Rukh Khan Bodyguard Debut : शाहरुख खानचा बॉडीगार्डने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan Bodyguard Debut
Shah Rukh Khan BodyguardSAAM TV
Published On
Summary

शाहरुख खानच्या बॉडीगार्डचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले आहे.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये शाहरुख खानच्या बॉडीगार्ड दिसणार आहे.

शाहरुख खानच्या बॉडीगार्डचे नाव रवी सिंग आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा चित्रपटात झळकला. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक देखील करण्यात आले. आता मात्र शेरानंतर शाहरुख खानच्या बॉडीगार्ड रवी सिंग ( Bodyguard Ravi Singh) अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan ) बॉडीगार्ड एक छोटी भूमिका साकारणार आहे. शाहरुख खानच्या लेकाने आर्यन खानने रवीला मोठी संधी दिली आहे.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' 18 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात अनेक तगडे स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यातून शाहरुख खानचा लेक आर्यन खान दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंग देखील या मालिकेचा भाग असणार आहे. यात शाहरुख खऱ्या आयुष्याप्रमाणेच बॉलिवूडच्या बादशहाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रवी शाहरुखच्या बॉडीगार्डच्या भूमिकेत दिसणार आहे. याची एक झलक नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या ट्रेलरमध्ये शेवटी रवी सिंग शाहरुखसोबत दिसत आहे. रवी सिंग बॉलिवूडच्या महागड्या बॉडीगार्डमध्ये होते. तो बऱ्याच काळापासून शाहरुखसोबत काम करत आहे. शाहरुख खान आणि रवी सिंगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे. कारण यात बॉलिवूडचे तिन्ही खान एकत्र दिसणार आहेत.

शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. यांनी आजवर सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र आतापर्यंत एकही चित्रपट एकत्र केला नाही आहे. त्यामुळे तिन्ही शाहरुख, सलमान आणि आमिर खान पहिल्यांदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये अनेक तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Shah Rukh Khan Bodyguard Debut
Box Office Collection : 'बागी 4', 'परम सुंदरी' की 'द बंगाल फाइल्स' कोणाचा शो हाऊसफुल? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com