Bigg Boss 19: धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाला, 'उद्या त्यांचा वाढदिवस आणि...'

Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ ग्रँड फिनालेदरम्यान दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना खास श्रद्धांजली देण्यात आली. सलमान खान त्यांच्या आठवणीत भावूक झाले आणि डोळ्यात पाणी आले. या भावनिक क्षणाची सविस्तर माहिती वाचा.
salman khan gets emotional to remember dharmendra
salman khan gets emotional to remember dharmendra Saam Tv
Published On

Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले नेहमीप्रमाणे भव्य सजावटीत, ग्लॅमरने आणि भावनांनी भारलेला पाहायला मिळाला. या सीझनचा विजेता कोण होणार, कोणत्या परफॉर्मन्सने स्टेज गाजवला याबरोबरच एक खास क्षण असा होता ज्याने प्रेक्षकांसह उपस्थित कलाकारांनाही भावूक केले ते म्हणजे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना दिलेली श्रद्धांजली.

कार्यक्रमात एक विशेष व्हिडिओ पॅकेज दाखवण्यात आले ज्यात धर्मेंद्र यांच्या सुपरहिट चित्रपटांतील प्रसंग, त्यांचे मनमिळावू क्षण, आणि ‘बिग बॉस’ मंचावर त्यांनी घेतलेली उपस्थिती दाखवण्यात आली. धर्मेंद्र यांच्या आनंदी स्वभावामुळे आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे ते नेहमीच प्रेक्षकांचे लाडके राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणींनी संपूर्ण सेट काही काळासाठी स्तब्ध झाला.

salman khan gets emotional to remember dharmendra
Saree Draping Style: लग्नसराईसाठी साडी ड्रेपिंगच्या नविन आयडिया शोधताय? मग या पद्धतीने साडी नक्की नेसून मिळेल ग्लॅमरस लूक

या श्रद्धांजलीदरम्यान होस्ट सलमान खान स्वतःही भावूक झाला. धर्मेंद्र यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे नाते, कुटुंबासारखा असलेला आपुलकीचा संबंध यामुळे सलमानच्या डोळ्यात अश्रू तरळले. व्हिडिओ संपल्यानंतर सलमान म्हणाला, “धर्मेंद्रजी आमच्यासाठी फक्त एक ज्येष्ठ कलाकार नव्हते. ते आमच्या कुटुंबाचा भाग होते. उद्या त्यांचा वाढदिवस असता ते आज आमच्यात नाहीत हे स्वीकारणं अजूनही कठीण आहे.”

salman khan gets emotional to remember dharmendra
Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण? टॉप ५ स्पर्धकांची कमाई जाणून घ्या

प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्याविषयीच्या आठवणी व्यक्त केल्या आणि ‘बिग बॉस’च्या या भावनिक क्षणाचे कौतुक केले. अनेकांनी लिहिले की शोने या महान अभिनेत्याला दिलेली श्रद्धांजली अत्यंत सुंदर आणि मनाला भिडणारी होती. ‘बिग बॉस 19’ च्या या भावनिक फिनालेने पुन्हा एकदा सिद्ध केले की धर्मेंद्र यांचे स्थान भारतीय सिनेमात आणि प्रेक्षकांच्या मनात सदैव अढळ राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com