Film Crew Hostage: धक्कादायक! बिग बॉस फेम अभिनेत्रीसह ५० क्रू मेंबर्सला बनवलं बंदी, नेमकं झालं काय होतं?

Film Crew Hostage: राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, क्रू मेंबर्सना हॉटेलमध्ये बंद करण्यात आले होते.
Film Crew Hostage
Film Crew HostageSaam Tv
Published On

Film Crew Hostage: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चित्रपटसृष्टीशी संबंधित एक गंभीर घटना समोर आली आहे. 'नेमेसिस' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ४५ ते ५० लोकांचा क्रूला एका हॉटेलमध्ये बंदी बनवण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते (आलोक कुमार चौबे आणि संजय गुप्ता) यांनी हॉटेल आणि क्रूला वेळेवर पैसे न दिल्याचा आरोप आहे. यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने दरवाजे बंद केले. परिणामी, हॉटेलमधून कर्मचारी, क्रू बाहेर पडू शकत नाहीत.

१३ दिवसांत बजेट संपला

१३ डिसेंबर २०२५ रोजी भोपाळमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. योजनेनुसार, चित्रीकरण सतत सुरू राहणार होते. परंतु बजेट अभावी निर्माते फक्त १३ दिवसच चित्रीकरण करू शकले. उर्वरित काळात, पैसे न मिळाल्याने शूटिंग वारंवार थांबत होते. १ जानेवारीपासून, क्रू सदस्य निर्मात्यांशी वारंवार संपर्क साधत आहेत. परंतु प्रत्येक वेळी त्यांना पैसे येत आहेत आणि लवकरच दिले जातील असे सांगण्यात आले आहे.

Film Crew Hostage
Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

निर्मात्यांच्या परस्पर करारांचा फटका क्रूला

चित्रपटात सहभागी असलेल्या दोन्ही निर्मात्यांमध्ये आर्थिक करार झाल्याचा आरोप क्रू सदस्यांनी केला आहे. एका निर्मात्याने दुसऱ्या निर्मात्याला १.२५ कोटी पर्यंत पैसे दिले आणि नंतर माघार घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे संपूर्ण भार दुसऱ्या निर्मात्यावर पडला, त्याच्याकडे हॉटेल किंवा क्रूला देण्यासाठी पैसे नव्हते.

Film Crew Hostage
Chocolate Coffee Recipe: कॉफी प्यायला आवडते? मग एकदा घरच्या घरी ट्राय करा टेस्टी आणि रिफ्रेशिंग चॉकलेट कॉफी

हॉटेलचे २० लाखांचे बिल थकले

चित्रपटाचे क्रू आणि युनिट सदस्य ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत त्या हॉटेलचे अंदाजे १.५ लाखांचे बिल थकले आहे. याव्यतिरिक्त, दुसऱ्या हॉटेलचेही अंदाजे ५ लाख रुपये थकले आहेत. हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रॉडक्शन हाऊसला पैसे भरण्यासाठी कळवत आहेत. कोणताही उपाय सापडला नाही तेव्हा त्यांना थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी हॉटेलच्या गेट कुलूप लावावे लागले.

बाहेर पडण्याचा मार्ग नाही

परिस्थिती इतकी गंभीर झाली की क्रू सदस्यांनी त्यांच्या बॅगा आणि सामानासह हॉटेल सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना थांबवण्यात आले. हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्टपणे सांगितले की थकबाकी भरल्याशिवाय कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही. अनेकांनी सांगितले की त्यांच्याकडे हॉटेलला पैसे देण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत. कारण त्यांना अनेक महिन्यांपासून त्यांचे वेतन मिळाले नाही.

Film Crew Hostage
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ मध्ये झळकणार 'हे' स्पर्धक; रितेश देशमुख म्हणाला, 'या सीझनमध्ये...'

मुख्य कलाकार भोपाळमधून निघाले

सूत्रांचे म्हणणे आहे की चित्रपटातील मुख्य अभिनेत्री, 'बिग बॉस १६' आणि 'खतरों के खिलाडी १४' फेम निमृत कौर अहलुवालिया, आधीच भोपाळमधून निघाली आहे. दिग्दर्शक आणि काही सदस्य दुसऱ्या हॉटेलमध्ये राहत होते. जिथे अशाच प्रकारच्या आर्थिक अडचणी येत होत्या. हॉटेल व्यवस्थापनाने २६ डिसेंबर रोजी चेकआउट करण्यास सांगितले होते. परंतु प्रॉडक्शन हाऊसने क्रू सदस्यांना वेळेवर माहिती दिली नाही. एके दिवशी सकाळी त्यांना एक फोन आला की ज्यामध्ये त्यांना लगेच चेकआउट करावे लागेल. त्यामुळे क्रू आणि दिग्दर्शकाला तासन्तास हॉटेलच्या लॉबीमध्ये बसून परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहावी लागली.

पोलिसांची माहिती

पोलिसांच्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोनदा हॉटेलला भेट दिली. हॉटेल व्यवस्थापनाने कोणतीही तक्रार दाखल केली नाही. चित्रपटाच्या युनिटने असेही म्हटले आहे की हा परस्परांमधील विषय आहे. त्यांना कोणत्याही अडचणी येत नाहीत. मिसरोड पोलिस स्टेशनचे प्रभारी रतन सिंग परिहार म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली आहे की हॉटेल अभिनंदन पॅलेसमध्ये एक फिल्म युनिट राहत आहे. त्यांचे हॉटेल कर्मचाऱ्यांशी आर्थिक व्यवहार आणि सर्व्हिसबाबत काही वाद आहेत, जे ते स्वतःहून सोडवत आहेत. या संदर्भात कोणीही पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. पण, पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com