Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Film Director Dies: 'डॅमनेशन' आणि 'सॅटांटांगो' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक बेला तार यांचे मंगळवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. बेला तार यांच्या पश्चात त्यांची पत्नी हरनिट्झकी आहे.
Famous film Director and producers Bela Tarr Dies At age 70
Famous film Director and producers Bela Tarr Dies At age 70Saam Tv
Published On

Famous film Director Dies: प्रसिद्ध हंगेरियन चित्रपट दिग्दर्शक- निर्माता बेला तार यांचे मंगळवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. ते "डॅमनेशन" आणि "सॅटांटांगो" सारख्या भयावह चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते. त्यांना 'स्लो सिनेमा' चळवळीचे संस्थापक मानले जाते. अकादमीने माहिती देत सांगितले की त्यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

अकादमीचे निवेदन

'एक महान दिग्दर्शक आणि एक मजबूत राजकीय आवाज असलेले बेला तार यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करत आहोत. त्यांच्याप्रती मनापासून आदर व्यक्त करतो. या काळात त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया विचारू नये अशी विनंती आहे'. असे अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे.

Famous film Director and producers Bela Tarr Dies At age 70
Varanasi Release Date: १३०० कोटींचा 'वाराणसी' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित!

स्लो सिनेमाचे संस्थापक

बेला तार हे स्लो सिनेमा शैलीचे प्रमुख होते. या शैलीमध्ये काळे-पांढरे सीन, लांबलचक मोठे सीन, कमी संवाद आणि पूर्व युरोपातील दैनंदिन जीवनाचे उदासीन चित्रण यांचा समावेश आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचा १९९४ चा सात तासांचा चित्रपट 'सॅटांटांगो' सिनेमा.

Famous film Director and producers Bela Tarr Dies At age 70
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ मध्ये झळकणार 'हे' स्पर्धक; रितेश देशमुख म्हणाला, 'या सीझनमध्ये...'

करिअरची सुरुवात

बेला तार यांचा जन्म २१ जुलै १९५५ रोजी पेक्स, हंगेरी येथे झाला. लहानपणी ते टेलिव्हिजनवर छोट्या भूमिकांमध्ये दिसले. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. त्यांच्या हौशी व्हिडिओंमुळे त्यांना १९७९ मध्ये 'फॅमिली नेस्ट' या त्यांच्या पहिल्या प्रमुख चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या बेला बालाझ स्टुडिओचा पाठिंबा मिळाला. त्यांच्या सर्वात प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'द आउटसाइडर', 'द प्रीफॅब पीपल' आणि 'अल्मनॅक ऑफ फॉल' यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com