Bhootam Bhayyam: सात मित्रांच्या आयुष्यात घडणार रहस्यमयी घटना; ऑरेंज ज्यूस गँगच्या 'भूतम भयम्'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

Bhootam Bhayyam: ‘भूतम भयम्’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. हॉरर, कॉमेडी आणि थराराचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Bhootam Bhayyam
Bhootam BhayyamPR
Published On

Bhutam Bhayam: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विनोद, रहस्य, थरार आणि भव्य दृश्यरचना यांचा सुरेख मिलाफ असलेल्या या टीझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

टीझरमध्ये सात मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या रहस्यमय घटनांची झलक दाखवण्यात आली आहे. एका गूढ आणि भयावह वातावरणात अडकलेल्या या मित्रांचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळतात. थरारक प्रसंगांसोबतच विनोदाची अचूक पेरणी करण्यात आल्याने चित्रपटाचा टोन ताजा आणि मनोरंजक वाटतो.

Bhootam Bhayyam
Salman Khan: 'तेरे नाम २.०...';' सलमानचा नवा लूक पाहून आमीर-करिनाला बसला धक्का, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल राधे

या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली ‘ऑरेंज ज्यूस गँग’. ही टीम पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर, करण सोनावणे, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांचा हटके अंदाज टीझरमध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या पात्रांभोवतीचे रहस्य कायम ठेवण्यात आल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Bhootam Bhayyam
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

टीझरमधील भव्य दृश्यरचना आणि दर्जेदार व्हिज्युअल इफेक्ट्स विशेष लक्ष वेधून घेतात. मराठी चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळणारा सिनेमॅटिक स्केल या चित्रपटात अनुभवायला मिळणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते. त्यामुळे ‘भूतम भयम्’ हा केवळ हॉरर-कॉमेडी चित्रपट न राहता एक भव्य मनोरंजनाचा अनुभव ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांनी सांगितले की, टीझर हा चित्रपटाच्या विश्वाची फक्त एक छोटी झलक आहे. प्रेक्षकांना विनोद आणि भय यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार असून मोठ्या पडद्यावर हा अनुभव अधिक रोमांचक असेल.

https://www.youtube.com/watch?v=x-Kfr-aAXVgनिर्माते नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनीही मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध चित्रपट सादर करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख भावेश जानवलेकर यांनीही चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com