Actor Death: समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

Malcolm-Jamal Warner Dies: प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. माल्कम-जमाल वॉर्नर असं या अभिनेत्याचे नाव असून ५४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Actor Death: समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा
Actor DeathSaam Tv
Published On

मनोरंजन विश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. ८० च्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो 'द कॉस्बी शो' मध्ये थियो हक्सटेबलची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता माल्कम-जमाल वॉर्नरचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अभिनेत्याने वयाच्या ५४ व्या वर्षी जगाचा निरप घेतला. समुद्रामध्ये पोहत असताना या अभिनेत्याचा बुडून मृत्यू झाला. माल्कम जमाल वॉर्नरच्या मृत्यूमुळे हॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली.

५४ वर्षीय अभिनेता माल्कम जमाल वॉर्नर हा आपल्या कुटुंबीयांसोबत कोस्टा रिकामध्ये सुट्टी इन्जॉय करण्यासाठी गेला होता. यावेळी समुद्रात पोहत असताना तो अचानक जोरदार लाटांमध्ये अडकला. त्याने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण बराच वेळ श्वास रोखून धरल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो खोल समुद्रात बुडाला. कोस्टा रिकाचे पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर लिमन शहरातील कोकल्स बीचजवळ त्याचा मृतदेह सापडला.

Actor Death: समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा
Former MLA Lavoo Mamledar Dies : बाहेर जाताना रिक्षाला कट, माजी आमदाराला बेदम मारहाण, काही क्षणात मृत्यू; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी वॉर्नर लिमोन प्रांतातील प्लेया ग्रांडे डे कोकालेस येथील समुद्रात पोहत होता त्याचवेळी ही भयंकर घटना घडली. समुद्र किनाऱ्याजवळ पोहत असताना अचानक मोठी लाट आली आणि या लाटेमुळे वॉर्नर खोल समुद्रात खेचला गेला. त्याला परत बाहेर पडता आलेच नाही. या समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. वॉर्नर बुडत असल्याचे पाहून समुद्रकिनारी असणाऱ्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण उशिर झाला होता. कोस्टा रिका रेडक्रॉस टीमने त्याला समुद्रातून बाहेर काढले पण त्याचा मृत्यू झाला होता.

Actor Death: समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा
Kalamb Woman Dies : महिलेचा मृतदेह घरात पडून असल्याने दुर्गंधी, देशमुखांच्या हत्येशी संबंध, अंजली दमानियांचा दावा; पोलिसांनी दिली वेगळीच माहिती

माल्कम-जमाल वॉर्नर १९८४ ते १९९२ पर्यंत चालणाऱ्या लोकप्रिय सिटकॉम 'द कॉस्बी शो'मध्ये थियो हक्सटेबलची भूमिका साकारली होती. या भूमिकेद्वारे तो घराघरात पोहचला. या शोमध्ये तो डॉक्टर हक्सटेबलचा धाकटा मुलगा होता. थियोची भूमिका साकारणारा वॉर्नर केवळ एक उत्तम अभिनेता नव्हता तर नंतर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्याने आपली ओळख निर्माण केली होती. माल्कम जमाल वॉर्नरच्या अचानक मृत्यू झाल्यामुळे हॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली.

Actor Death: समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा
Youth Dies: पोहायला गेला अन् पाण्यातच दम लागला, श्वास कोंडल्यानं जागीच जीव सोडला; आई-बापानं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com