Kalamb Woman Dies : महिलेचा मृतदेह घरात पडून असल्याने दुर्गंधी, देशमुखांच्या हत्येशी संबंध, अंजली दमानियांचा दावा; पोलिसांनी दिली वेगळीच माहिती

Santosh Deshmukh Murder Case Update : कळंब शहरातील द्वारका नगरीत मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली आहे.
Kalamb Woman body found in a flat
Kalamb Woman body found in a flat Saam Tv News
Published On

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी वेगळीच माहिती दिली आहे. त्यांनी दमानिया यांचा दावा फेटाळून लावला आहे. कळंब शहरातील द्वारका नगरीत मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

कळंब शहरातील द्वारका नगरीत मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली आहे. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतरही पोलिसांनी काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे. पोलीस विभागाकडे याबाबत कुठलीही माहिती नाही अंजली दमानिया यांना चुकीची माहिती असेल, त्यावर आम्ही काय बोलणार असं पोलिसांनी त्यांचं मत मांडलं आहे.

Kalamb Woman body found in a flat
Baban Gite : ५०० गाड्या घेऊन पवारांच्या राष्ट्रवादीत, ९ महिन्यांपासून फरार, तुरुंगात गिते गँगकडून वाल्मिकला मारहाण; कोण आहे बबन गिते?

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

गूढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतंय. या महिलेची ७ ते ८ दिवसांपुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी आणि स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता.

Kalamb Woman body found in a flat
Marathi Language Row : बँक, रेल्वे स्टेशनमध्ये मराठीतच बोला, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक लागले कामाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com