
बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. बीड जिल्हा कारागृहात आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बबन गिते याच्या समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यात मारामारी झाली. यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला देखील मारहाण करण्यात आली, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत.
बबन गिते नेमका कोण?
गेल्या नऊ महिन्यांपासून बबन गिते फरार आहे. बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गिते अद्याप समोर आलेला नाही.
आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या. एकूण ११ जणांवर गुन्हा नोंद होता. यात वाल्मिक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद होता. मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचं सांगून त्याचं नाव आरोपीतून वगळलं होतं.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन गितेने १७ ऑगस्ट २०२३ मध्ये परळीत मोठं शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. जवळपास ५००हून जास्त वाहनांच्या ताफ्यासह बबन गिते हा सभास्थळी आला होता. त्यावरून गिते याच्यामागे परळीतील मोठी जनशक्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीच्या कुठल्याच मोठ्या नेत्याचं आतापर्यंत एवढ मोठं शक्तीप्रदर्शन झालं नव्हतं. शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून गिते याला बळ दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.