
खार पाणी प्यायलं तर किडनी फेल होते हे सर्वांना माहिती आहे. राज्यभरात अनेक नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. अकोल्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे. अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघात अंतर्गत ६० पेक्षा अधिक गावात खारं पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झाले आहेत. इतकंच नाही तर अनेकांच्या किडनी फेल झाल्या आहेत. एक नव्हे तर दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. तब्बल शेकडो जणांना खारं पाणी प्यायलाने किडनीच्या संबंधित आजार झाले आहेत.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या सावरपाटी गावातील नागरिकांमध्ये सध्या किडनीच्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. विहिरी आणि बोअरमधलं क्षारयुक्त पाणी इथले गावकरी पित आहेत. यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार गावाकऱ्यांना होत आहेत. तर अनेकांना किडनी फेल झाल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सावरपाटी गावात तीन ते चार जणांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे आजार झाले. तर एकाला आपली किडनी गमावावी लागलीय. प्रशांत काळे या व्यक्तीची किडनी पूर्णतः फेल झाली. त्यांना उपचारासाठी १२ लाखांवर खर्च आला. यासाठी त्यांनी शेती विकली खरी मात्र तरीही फायदा झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
बाळापूर तालुक्यातल्या जवळपास ६० पेक्षा अधिक गावात हिच परिस्थिती आहे. पारस ते निंबा फाटापर्यंत असलेल्या सर्व गावी हे खारपणपट्ट्यात वळतायेत. दुसरीकडे घरोघरी नळ असले तरी पाण्याच्या टाकीत चढणारं पाणी हे गावातील विहिरी आणि बोअरवेल मधीलच आहे. इथलं पूर्णतः क्षारयुक्त पाणी असल्यानं अनेकांना विविध आजाराला समोरे जावे लागतं आहे. याच्या बचावासाठी गावकरी १५ ते २० किमी अंतराराहून गोड पाणी दुचाकीवर पिण्यासाठी आणत आहेत. तर काहींना गोड पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.