Akola News: अकोल्यात पाणीपुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक; थेट अधिकाऱ्याला दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न

Akola News In Marathi : अकोल्यात पाणीपुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक भूमिका घेतलीये. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अधिकाऱ्याला दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.
akola
akola News Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात दूषित पाणीपुरवठा विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक भूमिका घेतली आहे. दूषित पाणीपुरवठ्यावरून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात शिवसेनेचा ठिय्या केला. यावेळी शिवसैनिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याला दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तर कार्यकर्त्यांनी कार्यालयातीलच खुर्चीवर चढत घोषणा दिल्या.

akola
Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार आंदोलन केलं आहे. अकोला शहराला मागील काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. इतकेच नाही तर अकोला महापालिकेने अकोलेकरांना अवाजवी पाणी बिल पाठवल्याचा आरोप शिवसेनेने यादरम्यान केलाय. याच पाणी बिलाची शिवसेनेने महापालिकेतच होळी केली आहे. तसेच सुधारित बिल आल्याशिवाय अकोलेकरांनी पाणी बिल भरु नये, असे आवाहनही शिवसेनेने केले आहे.

दरम्यान, आज शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात हे आंदोलन होतं. अकोलेकरांना होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा विरोधात शिवसेनेना आक्रमक होत चक्क पाणीपुरवठा अधिकाऱ्याला दूषित पाणी प्यायला देण्याचा प्रयत्न केलाय.

akola
Eknath Shinde Song : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...; कामराला शिंदे गटाचा जबरा उत्तर, उद्धव ठाकरेंवरही बाण, VIDEO

शिवसैनिकांनी पाणी बिल अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकून दिले. अख्खा कार्यालय शिवसेनेच्या पदाधिकांनी गजबजल होतं. तर काही शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी थेट महापालिका कार्यालयातील खुर्चीवर चढत घोषणाबाजी दिल्या. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

akola
Bengaluru Murder case : पुण्याचं जोडपं, बेंगळुरुत सुटकेस हत्याकांड; मध्यरात्री नेमकं काय घडलं? घटनाक्रम वाचा

दर महिन्याला पाणी बिल देण्याची मागणी केली होती. मात्र, दोन वर्षांनी एकदा पाणी बिल दिलं जातं आहे. नागरिकांना अवाजवी नळाचे बिल आले असेल, अशा नागरिकांनी सुधारित बिल येईपर्यंत पाणी बिल भरू नये. अकोला जिल्हा शिवसेना त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी अकोलेकरांना आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com