अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी
Akola Crime News : अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय. अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगड ठेचून काढला.
रविवारी रात्री उशिरा अकोला रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सद्यस्थित हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत कले. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होतोय? रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो आहे.
नेमकं काय घडलं होतंय?
रविवार, १६ मार्च रोजी रात्री पावणेदहा वाजता सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर गावंडे नामक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळ काढला होता. या चोरट्यांचा पाठलाग महिलेचे पती हेमंत गावंडे यांनी केला. काही अंतरावर पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यादरम्यान गावंडे यांना बेदम मारहाण झाली, तसेच दगडाने त्यांचा चेहरा देखील ठेचून काढला आहे. घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांचे पथकही दाखल झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.