Nandurbar Police : नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करी; पोलिसांनी कारवाई करत ९ लाखाचा साठा केला जप्त

Nandurbar News : कार थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने पोलिसांवर गाडी चालवून पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत
Nandurbar Police
Nandurbar PoliceSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात अन्य राज्यातून दारूची तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यात विदेशी दारूची तस्करी केली जात असताना विसरवाडी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ३६ हजार रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केली असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील दहिवेलकडून विसरवाडीकडे एका कारमधून दमणसाठी दारू तस्करी करून नेली जात होती. या बाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तयार करून सरपणी नदी पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली. माहितीनुसार संशयित कार थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने पोलिसांवर गाडी चालवून पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. या कार्यवाहीत पोलिस उपनिरीक्षक देविदास वडगुले आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर बोरसे किरकोळ जखमी झाले आहेत. 

Nandurbar Police
Akola Crime : आधी मंगळसूत्र चोरलं, नंतर परत देत चोरट्यांनी महिलेला माफी मागितली; नेमकं काय घडलं?

मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात 

मात्र पुढे जाऊन अवजड वाहनांमुळे कार अडकल्याने पोलिसांनी कार अडवून तपासणी केली. यात दमणमध्ये विक्रीसाठी असलेली विदेशी दारूच्या पेट्या ज्याची किंमत ९ लाख ३६ रुपये आणि चार बनावट नंबर प्लेट्स जप्त केल्या आहेत. तसेच हेमंतकुमार धनसुखभाई राठोड (वलसाड, गुजरात) आणि जैनील रमेश पटेल (दमण) या दोन तस्करांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

Nandurbar Police
Akola : मुदतबाह्य कीटकनाशकांची पुन्हा नवी पॅकिंग; अकोल्यात समोर आला धक्कादायक प्रकार

गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांना टोळी अटक

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांवर चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिवापूर वार्डातील महिलांकडे गांजा सदृश्य वनस्पती बाळगून विक्री होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत ९ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवलेली वाळलेली हिरव्या रंगाची पाने, फुले, बिया असलेली गांजासदृश्य वनस्पती जप्त करण्यात आली. या वनस्पतीचे एकूण वजन १ किलो १५७.४ ग्रॅम असून गांजा विक्रीप्रकरणी मुस्कान ऊर्फ सेहा ऊर्फ भारती खैरे, पुष्पा  बानलवार या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com