Akola : मुदतबाह्य कीटकनाशकांची पुन्हा नवी पॅकिंग; अकोल्यात समोर आला धक्कादायक प्रकार

Akola News : मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : पिकांवर पडलेली रोगराई घालविण्यासाठी शेतकरी कीटकनाशक घेऊन फवारणी करत आहे. यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशक खरेदी केले जात आहे. मात्र अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. 

अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हि.जे. क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ठिकाणी हा प्रकार सुरु होता. याठिकाणी सुरु असलेल्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर कारवाई करण्यात आली. अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा मोठ्या प्रमाणात होता. या साठ्याची विक्री करण्याच्या अनुषन्गाने नवीन पॅकिंग केलेल्या बाटल्यांमध्ये ते भरले जात होते. 

Akola News
Akola Crime : आधी मंगळसूत्र चोरलं, नंतर परत देत चोरट्यांनी महिलेला माफी मागितली; नेमकं काय घडलं?

२२ लाख रुपयांचा साठा जप्त 

कंपनीत उपस्थित कर्मचारी व मजूर वर्गाकडून मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात कीटकनाशके कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून मुदतबाह्य ज्याची किंमत २१ लाख ९५ हजार रुपयांचा साठा कृषी विभागाने जप्त केला.

Akola News
Nashik : सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; तिघांविरोधात गुन्हा दाखल, नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

कीटकनाशकांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी 

दरम्यान कृषी विभागाच्या पथकाने या उत्पादन स्थळावरून आठ कीटकनाशकांचे नमुने घेण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. याबाबत प्राप्त अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com