Baloch Motion Poster: प्रविण तरडेच्या लूकने ‘बलोच’ची उत्सुकता शिगेला; रुपेरी पडद्यावर झळकणार मराठ्यांची असीम शौर्यगाथा

पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
Baloch Motion Poster
Baloch Motion PosterInstagram
Published On: 

Baloch Motion Poster Out: पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत ‘बलोच’मध्ये प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

Baloch Motion Poster
Shah Rukh Khan- Gauri Khan Argument Video: भर कार्यक्रमात शाहरुख- गौरीचं काय बिनसलं?, सोशल मीडियावर भलत्याच चर्चांना उधाण...

पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठ्यांना गुलामगिरी पत्करावी लागली. मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या नजरेत मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे तर मराठ्यांवर अत्याचार करणारा अफगाणी आहे. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, “ ‘बलोच’ ही एक सकारात्मक गोष्ट आहे. यापूर्वी आपण पानिपतबद्दल ऐकले आहे, ते केवळ पराभवाबद्दलच आहे. मात्र पानिपतच्या युद्धानंतर जेव्हा गुलामीच्या अवस्थेत असताना पुन्हा एकत्र येणे, संघर्ष करणे, ही गोष्ट प्रामुख्याने दाखवण्यात आली आहे. पानिपतचे युद्ध हे पराभव नसून शौर्य होते. हा चित्रपट पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी मला आशा आहे.”

Baloch Motion Poster
Pushpa 2 Update: 'पुष्पा २'च्या प्रोमोमधून अल्लू अर्जुनच गायब; चाहत्यांची होणार का निराशा?

कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांची असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com