Shah Rukh Khan- Gauri Khan Argument Video: भर कार्यक्रमात शाहरुख- गौरीचं काय बिनसलं?, सोशल मीडियावर भलत्याच चर्चांना उधाण...

अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी-इंटिरिअर डिझायनर गौरी खान अलीकडेच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Shah Rukh Khan- Gauri Khan Argument Video
Shah Rukh Khan- Gauri Khan Argument VideoSaam Tv
Published On: 

Shah Rukh Khan- Gauri Khan Viral Video: अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी-इंटिरिअर डिझायनर गौरी खान अलीकडेच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील (NMACC) कार्यक्रमात सहभागी झाले होते. या बॉलिवूडच्या क्यूट कपलचे सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. द जोडी लाइफ या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये हे कपल डान्स करता करता कोणत्या तरी कारणावरुन त्यांच्यात वाद होतो.

Shah Rukh Khan- Gauri Khan Argument Video
Ritika Shrotri New Movie: रितिका श्रोत्रीचा कधीही न पाहिलेला रोमँटिक अंदाज, लवकरच झळकणार ‘या’ सिनेमात..

यावेळी शाहरुखसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रमुख हजेरी लावली होती. शाहरुखसोबत अभिनेता रणवीर सिंह, वरुण धवन या कलाकारांनी NMACC इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला. या इव्हेंटमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये दोघे काही तरी बोलताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये शाहरुखचे हावभाव पाहून इव्हेंट दरम्यान शाहरुख आणि गौरीचं भांडण झालं होतं का? असा प्रश्न सध्या अनेक नेटकरी विचारत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत कोणत्या मुद्द्यावरुन त्यांच्यात वादाचे खटके उडाले आहे, असा सवाल नेटकरी करताना दिसत आहे.

Shah Rukh Khan- Gauri Khan Argument Video
Paras-Mahira Post: शो संपला आणि नातंही संपलं? Bigg Bossमधल्या या लव्हबर्ड्सचं ब्रेकअप

शाहरुख- गौरीचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काही संमिश्र कमेंट्स केल्या आहेत. ती व्हायरल व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणतो, ‘भर पार्टीत बायकोवर कशाला ओरडतोय रे?, नेहमीच महिलांशी चांगला वागणाऱ्या शाहरुखचा हा स्वभाव पाहून फार वाईट वाटलं.’ तर दुसरा नेटकरी म्हणतो, ‘कशाला ओरडोय कर ना पार्टी एन्जॉय.’ तर आणखी एक जण म्हणतो, ‘उगाचच चिडू नको रे, इतका राग बरा नव्हे...’ अशा नेटकऱ्यांनी शाहरुखला प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शाहरुख तब्बल चार वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठान’चित्रपटाच्या माध्यमातून तो झळकला आहे. शाहरुख या वर्षात एकूण तीन चित्रपटात तो झळकणार आहे, ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे, देशातच नाही तर, जगभरात चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. या वर्षात ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ हे मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ सेंटरमध्ये बनवण्यात आलं आहे. हे देशातलं सर्वात मोठं कलाकेंद्र असल्याचं म्हटलं जात आहे. या कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com