Balasaheb Thackeray Grandson: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 'हा' नातू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; चित्रपटाचे शूटिंग पूर्ण...

Balasaheb Thackeray: हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे अनुराग कश्यपसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ऐश्वर्यने राजकारणापासून स्वतःला दूर केले आणि अभिनयाची निवड केली आहे.
Balasaheb Thackeray's Grandson aaishvary thackeray
Balasaheb Thackeray's Grandson aaishvary thackerayGoogle
Published On

Balasaheb Thackeray Grandson : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे हा लवकरच चित्रपट निर्माते अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे, ऐश्वर्यला राजकारणात नाही तर चित्रपटांमध्ये करिअर करायचे आहे. त्याने त्याच्या कलेलावाव देण्यास खूप आधीच सुरुवात केली आहे.

माहितीनुसार ऐश्वर्यने २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. असे म्हटले जाते की या काळात त्याने केवळ दिग्दर्शननाचे धडे नाही तर अभिनयाचे बारकाई देखील शिकल्या आहेत.

Balasaheb Thackeray's Grandson aaishvary thackeray
Salman Khan: 'या' चित्रपटात माधुरी दीक्षित होणार होती सलमान खानची वहिनी; अचानक बदलला निर्मात्यांनी निर्णय

ऐश्वर्य एक उत्तम डान्सर आहे, तो मायकल जॅक्सनसारखा दिसतो.

ऐश्वर्य एक उत्तम डान्सर देखील आहे आणि मायकल जॅक्सनला हा त्याचा आदर्श आहे. मायकल जॅक्सनची शैली त्याच्या नृत्यशैलीत स्पष्टपणे दिसून येते. जर ऐश्वर्य अभिनयातही पारंगत झाला तर तो बॉलीवूडमध्ये नक्कीच आपले स्थान निर्माण करू शकेल.

Balasaheb Thackeray's Grandson aaishvary thackeray
Maha Kumbh 2025: हर हर महादेव...! मिलिंद सोमणने पत्नीसह केलं पवित्र स्नान; फोटो व्हायरल

लखनऊमध्ये ६९ दिवसांनंतर चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले.

लखनऊमध्ये ६९ दिवसांनंतर त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे झाले आहे. वृत्तानुसार, या प्रकल्पाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अनुराग कश्यपचाआणि ऐश्वर्य ठाकरेचा हा चित्रपट प्रदर्शन आधीपासूनच चर्चेत आहे. हा चित्रपट इंडस्ट्रीतील सर्व प्रॉडक्शन हाऊसमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रकल्पांपैकी एक बनला आहे. ऐश्वर्य हा स्मिता आणि जयदेव ठाकरे यांचा मुलगा आणि शिवसेना संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे. २००४ मध्ये स्मिता आणि जयदेवचा घटस्फोट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com