Salman Khan: 'या' चित्रपटात माधुरी दीक्षित होणार होती सलमान खानची वहिनी; अचानक बदलला निर्मात्यांनी निर्णय

Salman Khan and Madhuri dixit : सूरज बडजात्याचा प्रसिद्ध चित्रपटात सलमान खानच्या वहिनीच्या भूमिकेत माधुरी दीक्षितला कास्ट करण्यात आला होतं.पण काही कारणांमुळे तिला रिप्लेस करण्यात आला.
Salman and madhuri
Salman and madhuriGoogle
Published On

Salman Khan: १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला सूरज बडजात्याचा 'हम साथ साथ हैं' हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाने मोठ्या पडद्यापासून ते टीव्हीवर अनेक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. संयुक्त कुटुंबाच्या कथेवर आधारित या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. पण सलमान खानच्या वाहिनीच्या भूमिकेसाठी चेहरा शोधणे हे सूरज बडजात्यासाठी कठीण काम होते. अलीकडेच, एका संभाषणादरम्यान, चित्रपट निर्मात्याने खुलासा केला की त्यांना सुरुवातीला सलमानच्या वहिनीच्या भूमिकेत माधुरी दीक्षितला कास्ट करायचे होते.

माधुरीने त्याच्यासोबत 'हम आपके हैं कौन' मध्ये काम केले होते. पण नंतर सूरजने त्याला या चित्रपटासाठी नकार दिला. रेडिओशी झालेल्या संभाषणात, सूरज बडजात्या यांना विचारण्यात आले की त्यांनी या चित्रपटासाठी अनेक महिला कलाकारांशी संपर्क साधला होता, ज्यामध्ये माधुरीचाही समावेश होता. चित्रपट निर्मात्याने याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.

Salman and madhuri
Maha Kumbh 2025: हर हर महादेव...! मिलिंद सोमणने पत्नीसह केलं पवित्र स्नान; फोटो व्हायरल

आधी माधुरी सलमान खानची वहिनी होणार होती.

सूरज बडजात्या म्हणाले, “मी माधुरीला सांगितले होते की, मी एक पुरूषप्रधान चित्रपट बनवत आहे, जर मी तुला सलमान खानच्या सोबत कास्ट केले तर ती तुझ्यासाठी एक छोटी भूमिका असेल, पण जर मी तुला मोहनीश बहलच्या सोबत कास्ट केले तर तू सलमानच्या वहिनीच्या भूमिकेत दिसशील. पण ती खूप गोड व्यक्ती आहे, ती म्हणाली की काही फरक पडत नाही, मला एकत्र काम करायला आनंद होईल. पण नंतर मी स्वतः म्हणालो की कदाचित प्रेक्षकांना हे आवडणार नाही. त्या आधीच्या चित्रपटात 'हम आपके हैं कौन'मध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित दोघेही रोमँटिक भूमिकेत दिसले होते आणि चित्रपटाच्या यशानंतर त्यांची सर्वोत्तम ऑन-स्क्रीन कपल म्हणून ओळख निर्माण झाली होती.

Salman and madhuri
KL Rahul and Athiya Shetty 'लवकरच येणार नवा पाहुणा'; केएल राहुल आणि अथियाचे खास फोटो पाहिलेत का ?

अशा प्रकारे तब्बूचे कास्टिंग झाले

सूरज बडजात्या पुढे म्हणाले, “या भूमिकेसाठी असा चेहरा शोधणे कठीण होते ज्याने सलमानसोबत आधी काम केले नाही. नंतर आम्ही तब्बूला कास्ट केले आणि तिचे काम प्रेक्षकांना फार आवडले. तर सोनाली बेंद्रेने चित्रपटात सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com