Ashok Ma. Ma : 'अशोक मा.मा.' मालिकेत मामांनी उचललं मोठं पाऊल, घराची जबाबदारी सोपवली 'या' व्यक्तीवर

Ashok Ma. Ma Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत आता नवीन वळण पाहायला मिळणार आहे. अशोक मामा यांनी घराची जबाबदारी घरातील एका व्यक्तीवर सोपवली आहे. ती नेमकी कोण जाणून घेऊयात.
Ashok Ma. Ma Update
Ashok Ma. MaSAAM TV
Published On

'अशोक मा.मा.' (Ashok Ma. Ma) मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. अशोक मा.मा. मालिकेत सध्या घरात अनेक बदल झपाट्याने होताना दिसत आहेत. एका बाजूला अनिश आणि भैरवीचं नातं अधिक दृढ होतं चाललं आहे. दोघांमधील भावना आता लपून राहिलेल्या नाहीत आणि मामा याचे शांतपणे निरीक्षण करत आहेत. भैरवी आणि अनिशचे नाते आता एका नव्या वळणावर येताना दिसत आहे.

सध्या मालिकेत अक्षय तृतीया निमित्ताने मामांनी घेतलेला एक मोठा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी घराची संपूर्ण जबाबदारी भैरवीकडे सोपवली आहे. त्यामुळे भैरवीची जबाबदारी वाढली आहे. पण राधा मामी मात्र वेगळीच स्वप्न रंगवते आहे. तिची ती स्वप्न पूर्ण होतील की मामा भैरवीच्या साथीने ती उधळून लावतील हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. चाहते देखील मालिकेत पुढे काय घडणार पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'अशोक मा.मा.' मालिकेत दुसरीकडे घरात एक गुप्त डावपेच शिजतोय. राधा मामी आणि किश्या मामा यांनी घरात राहण्यासाठी मिळवलेली माफी आणि विश्वासाची संधी आता एका नव्या खेळीचा भाग ठरत आहे. राधा घरातील स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तिचे स्वप्न या घराची 'राणी' होण्याचे आता उघडपणे व्यक्त होऊ लागलं आहे. भैरवीवरची जबाबदारी, अनिशसोबत वाढते नाते, मामांचा निर्णय आणि राधा मामीच्या गुंतागुंतीच्या योजना या सगळ्यामुळे घरात नात्यांची समीकरणं सतत बदलत आहेत.

'अशोक मा.मा.' मालिकेत पुढे काय होणार? कोणाच्या हातात राहणार घराची सूत्रं? हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. 'अशोक मा.मा.' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

Ashok Ma. Ma Update
Shehnaaz Gill : शहनाझ गिलनं खरेदी केली लग्जरी कार; किंमत वाचून धक्का बसेल, पाहा PHOTO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com