Shehnaaz Gill : शहनाझ गिलनं खरेदी केली लग्जरी कार; किंमत वाचून धक्का बसेल, पाहा PHOTO

Shehnaaz Gill Buys A New Car: अभिनेत्री शहनाझ गिलने नुकतीच लग्जरी कार खरेदी केली आहे. कारचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Shehnaaz Gill Buys A New Car
Shehnaaz Gill SAAM TV
Published On

'बिग बॉस'मुळे खूप लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री शहनाझ गिल (Shehnaaz Gill) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगली चर्चेत असते. तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. 'बिग बॉस'मध्ये असताना तिचा गेम चाहत्यांना खूप आवडला होता. तिने आपल्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

शहनाझ गिलने घरी नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे. शहनाझने नुकतीच नवीकोरी लग्जरी कार खरेदी केली आहे. याचे फोटो शहनाझने सोशल मिडिया शेअर केले आहेत. शहनाझने फोटोंना हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "स्वप्नांपासून ते ड्राईव्हवेपर्यंत...माझ्या मेहनतीला आता चार चाके मिळाली आहेत...खरोखरच धन्य वाटत आहे!" तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शहनाझ गिलची नवीन कार

मीडिया रिपोर्टनुसार, शहनाझ गिलने मर्सिडीज बेंझ जीएलएस एसयूव्ही ही कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत जवळपास 1.34 कोटी ते 1.39 कोटी पर्यंत आहे.

शहनाझ गिलने नवीन गाडीसोबत छान फोटोशूट केले आहे. कारच्या शोरुममध्ये शहनाझचे नवीन गाडीसाठी छोटे सेलिब्रेशन देखील करण्यात आले आहे. तसेच फोटोंमध्ये शहनाझ गाडीची पूजा करताना देखील दिसत आहे. चाहते आता शहनाझच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. शहनाझचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने चित्रपटांसोबत म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे.

Shehnaaz Gill Buys A New Car
Badshah : बादशाह विरोधात FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com