Ashok Ma. Ma : 'अशोक मा.मा.' मालिकेत नवा ट्विस्ट, मामांनी दिलं भैरवीला चॅलेंज

Ashok Ma. Ma Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत आता नवीन वळण पाहायला मिळणार आहे. अशोक मामा यांनी भैरवीला चॅलेंज दिले आहे.
Ashok Ma. Ma Update
Ashok Ma. MaSAAM TV
Published On

'अशोक मा.मा.' (Ashok Ma. Ma) मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत भैरवीने अनिशसोबत लग्न केले असून आता ती मामांच्या घरात राहायला आली आहे. भैरवीच्या येण्यामुळे तिच्यातील आणि अशोक मामा यांच्यातील तणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. मामांनी भैरवीला आठ दिवसांचे चॅलेंज दिलंय ज्यानुसार मुलांना त्यांच्याच नजरेसमोर सांभाळण्याचे आहे.

मामांनी भांडी घासायचे ठरवले आणि भैरवीला दूध घेऊन येण्यास सांगितले. मात्र भैरवीचं लक्ष नसल्याने ते स्वतःच दूध घ्यायला गेले. याच दरम्यान घरातील कामे आणि मुलांच्या जबाबदाऱ्या वाटण्यातून वाद विकोपाला गेला. भैरवीची तब्येत बिघडल्याचे पाहून प्रभूने ती गोष्ट मामांना सांगितली. पण मामांनी तिला उगाच अफवा पसरवू नकोस असे सुनावले. मामांनी मुलांना कामे वाटल्यामुळे भैरवीचा पारा चढला. तिने हे मुद्दाम केले जात आहे असे अनिशला सांगितले.

दुसरीकडे या सगळ्याला कंटाळून अनिशने सगळी कामे स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात घरातील मुलं मात्र भैरवीच्या स्वयंपाकावर नाराज आहेत. तर नवीन हिंदी भाषिक मोलकरणीच्या येण्यामुळे आणखी गोंधळ उडालाय. तणावाच्या या वातावरणात पंखुडीचे गाणं, संयमीची पार्टी आणि प्रियाच्या हेअर स्टाईलवरून झालेला वाद सगळे काही अधिक गुंतागुंतीचे होत आहे.

भैरवीने हे आव्हान स्वीकारलं असले तरी तिच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. आता या अडचणी काय असतील? ती मामांना दिलेले चॅलेंज कसे पूर्ण करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिका संध्याकाळी 8.30 ला पाहायला मिळते.

Ashok Ma. Ma Update
OTT Releases : रंग बरसे रे..., होळीत मनोरंजनाची मेजवानी, OTTवर पाहा 'हे' चित्रपट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com