OTT Releases : रंग बरसे रे..., होळीत मनोरंजनाची मेजवानी, OTTवर पाहा 'हे' चित्रपट

Movie -Web Series : मार्च महिन्यात घरबसल्या मनोरंजनाचा डबल धमाका अनुभवता येणार आहे. ओटीटीवर चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.
Movie -Web Series
OTT Releases SAAM TV
Published On

मार्च महिन्यात होळीच्या रंगांसोबत मनोरंजनाच्या रंगात देखील रंगून जा. अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला घरबसल्या चित्रपटांची मेजवानी घेता येणार आहे. यात तुम्हाला चित्रपट वेब सीरिज पाहता येणार आहेत.

सलमान सोसायटी

'सलमान सोसायटी' चित्रपटात संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाचं महत्त्व सांगितले आहे. 'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट शिक्षणाच्या विषयावर भाष्य करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलास काशिनाथ पवार यांनी केले असून हा चित्रपट 7 मार्चला पाहता येणार आहे. या चित्रपटात एका सोसायटीत राहणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या संघर्षांची हृदयस्पर्शी कहाणी दाखवण्यात आली आहे. दरम्यान त्या कुटुंबांना येणाऱ्या विविध अडचणी आणि त्या अडचणींवर मात करताना मुलांनी दाखवलेली जिद्द आणि धैर्य हे या चित्रपटाचे मूळ उद्दिष्ट आहे.

Movie -Web Series
Chhaava Box Office Collection: 'छावा' लवकरच रचणार नवा इतिहास, ५०० कोटींपासून काही पावले दूर

राख

'राख' वेब सीरिजमध्ये गुन्हेगारी, राजकारण आणि सत्याचा खेळ दाखवण्यात आला आहे. 'राख' ही क्राईम, थ्रिलर वेब सीरिज आहे. ही सिरीज 28 मार्चला ओटीटीवर येणार आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केले आहे. या कहाणीत एका हत्येचा तपास फसवणूक, राजकीय कटकारस्थाने आणि सूडाच्या चक्रव्यूह दाखवण्यात आले आहे. शिवाय या वेब सीरिजमध्ये अजिंक्य राऊत, गौरी नलावडे, रोहित कोकाटे, मिलिंद शिंदे, मिलिंद दास्ताने, चैतन्य देशपांडे, ऋतुराज शिंदे, नेहा बाम, विनायक चव्हाण, कृष्ण रघुवंशी यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

टोपीवाले कावळे

'टोपीवाले कावळे' चित्रपट राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आहे. जो महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा निर्धार करणाऱ्या काही सामान्य लोकांच्या संघर्षाची कहाणी सांगतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून हा चित्रपट 21 मार्च ओटीटीवर पाहता येणार आहे. या चित्रपटात प्रचार मोहिमेतील अडथळे आणि जनतेचे समर्थन जिंकण्यासाठी वापरलेल्या युक्त्या विनोदी शैलीत सुरेखपणे दाखवण्यात आलेल्या आहेत.

Movie -Web Series
Aai Tuljabhavani : जागर स्त्री शक्तीचा, पाहा 'आई तुळजाभवानी' मालिकेचा विशेष भाग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com