सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांनी आपल्या सुमधूर आवाजाने सर्वांनाच वेड लावलं.आजवर त्यांनी १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांची खासियत म्हणजे त्यांनी सर्व प्रकारच्या गाण्याशी स्वत:ला जुळवून घेतले. शास्त्रीय संगीतापासून ते रोमॅटिंक गाणी, गझलत्या गायच्या. त्यांनी प्रत्येक शैलीत आपल्या आवाजाची छाप सोडली.
आशा भोसले या प्रसिद्ध रंगभूमी अभिनेते दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आहेत तसेच गानसमाज्ञी लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण आहे. आशा भोसले यांच्या संगीतविश्वातला प्रवास हा सोपा नव्हता.कारण वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांनी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत गाणी गायला सुरू केले आणि कुटुंबाचा सांभाळ केला.
आशा भोसले यांनी ५० ते ९० च्या दशकात ओपी नय्यर, आरडी बर्मन, खय्याम आणि बप्पी लाहिरी सारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. त्यांनी अनेक सदाबहार गाणी गायली. आशा भोसले यांचा आवाज जितका मंत्रमुग्ध करणारा आहे तितक्याच त्या जेवण छान बनवतात. आशा भोसले यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे अनेकदा त्यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले होते.
आशा भोसले यांनी अत्यंत कमी वयात म्हणजेच १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. त्यांना तीन मुले होती. २ मुलं आणि एक मुलगी. पण लग्नाच्या ११ वर्षांनी ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर आशा भोसले यांनी १९८० मध्ये संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले. दोघांची पहिली भेट १९६६ मध्ये 'तीसरी मंजिल' या चित्रपटातील एका गाण्यादरम्यान झाली. त्यानंतर आशा भोसले यांनी आर.डी. बर्मन यांनी दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. एकत्र काम करताना दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि ही मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांना कळलेच नाही. 1980 मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.