Sakshi Sunil Jadhav
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. तर १२ एप्रिल २०२६ रोजी यांचे निधन झाले आहे.
आशा भोसले यांच्या वडिलांचे नाव दिनानाथ मंगेशकर होते. जे प्रसिद्ध गायक व नाट्यकलाकार होते.
घरातच संगीताचे वातावरण असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड निर्माण झाली.
वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी आशा भोसले यांनी गाण्याचा प्रवास सुरू केला. त्यांनी १२ हजारहून अधिक गाणी विविध भाषांमध्ये गायली आहेत.
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आल्याने त्यांनी गाणे आणि अभिनय सुरू केला. आशा भोसलेयांनी पहिल्यांदा मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं होतं.
आशा भोसलेंचे पहिलं गाणं हे मराठी चित्रपट माझा बाळ १९४३ साठी गायलं होतं. नंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला.
आशा भोसले यांच्या गाण्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि गोडवा आहे. त्यामुळे त्यांची गाणी आजही ताजी वाटतात. तर मराठी गाणं हे ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘रेशमाच्या रेघांनी’, केव्हातरी पहाटे, अरे खोप्यामधी खोपा अशी सुंदर गाणी त्यांनी गायली.
‘Zara Sa Jhoom Loon Main’ हे गाणे आजही पार्टीत आणि प्लेलिस्टमध्ये लोकप्रिय आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि काजोल दिसले होते. ‘ये मेरा दिल’हे डॉन चित्रपटातील हे गाणं आहे.
‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणं आजही सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांमध्ये येतं. तसेच बॉलिवूडमधील झुमका गिरा रे हे गाणं आजही लोकांच्या आवडीचे आहे. पुन्हा हा आवाज नव्या गाण्यातून जगाला ऐकू येणार नाही.