Amruta Fadnavis Post: अमृता फडणवीस यांनी गिरवले गायनाचे धडे; आशा भोसलेंकडून घेतल्या खास टिप्स

Amruta Fadnavis-Asha Bhosale: अमृता फडणवीस यांनी गायिका आशा भोसले यांची भेट घेतली
Amruta Fadnavis and Asha Bhosale
Amruta Fadnavis and Asha Bhosale Instagram @amruta.fadnavis

Amruta Fadnavis Posted Photo with Asha Bhosale: अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या कामाने चर्चेत असतात. तसेच त्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखल्या जातात. अमृता यांनी नुकतीच गायिका आशा भोसले यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' या पुरस्कारने गौरविण्यात आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या भेटीनंतर भावना व्यक्त करत पोस्ट देखील शेअर केली.

Amruta Fadnavis and Asha Bhosale
Jio Studios Event: नेटफ्लिक्स-अमेझॉनच्या टक्कर देणार जिओ स्टुडिओ; अंबानींच्या अॅपवर मोफत पाहता येणार सिनेमे आणि वेबसीरीज

अमृता यांनी त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'श्रीमती आशा भोसलेजी यांची भेट घेतली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांच्याशी संगीताबाबत छान संवाद साधला. त्यांनी मला गायनाचे सराव तंत्र आणि व्हॉईस मॉड्युलेशनबाबत खूप मार्गदर्शन केले. आता आमच्या पुढील संगीत सत्रासाठी उत्सुक आहोत.'

अमृता फडणवीस यांनी अशा भोसले यांचे अभिनंदन केले. परंतु त्याचसोबत आशा भोसले यांच्यासह एखादी कलाकृती त्या घेऊन येत असल्याची हिंट देखील दिली. त्यामुळे आता या दोघींचे गाणे येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

अमृता फडणवीसांनी आतापर्यंत ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’, ‘अज मैं मूड बणा लेया’ ही गाणी गायली आहेत.

काहीच दिवसांपुर्वी आशा भोसले यांना मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सुधीर मुनगंटीवार, सुरेश वाडकर, जॅकी श्रॉफ, उदित नारायण उपस्थित होते.

आशा भोसले पुरस्काराला उत्तर देताना म्हणाल्या, मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यासारखे वाटते आहे. महाराष्ट्रात आल्यावर वेगळीच भावना असते.

दहा वर्षांची असताना माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. मी यापुढेही गात राहणार. मला असे वाटते की, महाराष्ट्र भूषण मिळाला तो मला भारतरत्नासारखा आहे. माझ्या घरातून मिळालेला पुरस्कार आहे. मी ९० वर्षांपर्यत थांबले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com