Ameesha Patel : अमिषा पटेल अडचणीत; आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

Non Bailable Warrant Against Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणी वाढल्या आहेत. अमीषा पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल झाले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Non Bailable Warrant Against Ameesha Patel
Ameesha Patel SAAM TV
Published On
Summary

नुकताच राजपाल यादवला चेक बाउन्स प्रकरणात जामीन मिळाला आहे.

आता बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणी वाढल्या आहेत.

अमीषा पटेलच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाउन्स प्रकरणात तिहार तुरुंगातून जामीन मिळाला आहे. अशात आता बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणी वाढल्या आहेत. अमीषा पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल झाले आहे. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, 10 वर्षांपूर्वी मुरादाबाद येथील एका कार्यक्रमामुळे अमीषा पटेलच्या विरोधात वॉरंट दाखल झाले होते. आता त्याच संबंधित 16 फेब्रुवारी रोजी एसीजेएम-5 च्या कोर्टकडून अमीषा पटेलच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आले. कोर्टाकडून दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने तिला हे समन्स देण्यात आले आहे. आता कोर्टात हजर राहण्यासाठी अमीषा पटेलला नवीन तारीख देण्यात आली आहे.

अमीषा पटेलला आता 27 मार्चला कोर्टात हजर राहायचे आहे. मुरादाबाद इथल्या 'ड्रीम व्हिजन' इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी अमिषा पटेल विरोधात तक्रार दाखल केली. पवन कुमार यांनी पैसे मागितल्यावर अमिषाने अर्धी रक्कम परत केली. बाकी रकमेसाठी तिने चेक दिला. मात्र तो बाउन्स झाला.

10 वर्षांपूर्वी एका इव्हेंट कंपनीने अमीषा विरुद्ध तक्रार केली होती की, अमीषा पटेलने 2017 ला एका लग्नात परफॉर्मन्स करण्यासाठी तब्बल 11 लाख रुपये घेतले होते. मात्र पैसे देऊनही तिने कार्यक्रम केला नाही. परफॉर्मन्स करण्यासाठी अमीषा मुंबईहून दिल्लीला गेली होती. तेव्हा तिने ठरवलेल्या रक्कमेत आणखी दोन लाख रुपये वाढवून मागितले मात्र इव्हेंट कंपनीने ते देण्यास नकार दिला, त्यामुळे अमीषा परफॉर्मन्स न करता मुंबईला परतली. त्यामुळे कंपनीचे मालक पवन वर्मा यांनी अमीषाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आता या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे. अमीषा पटेल विरोधात मुरादाबाद न्यायालयात खटला सुरू आहे. तिच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 120-बी, 406,504 आणि 506 लावण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात अमीषा पटेलला जामीन मिळाला होता. मात्र तिने अटींचे पालन न केल्यामुळे अमीषा पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल झाले आहे.

Non Bailable Warrant Against Ameesha Patel
Rashmika-Vijay Wedding : रश्मिका-विजयची लग्नपत्रिका आली समोर; हैदराबादमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा, रिसेप्शन कुठे अन् कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com