मंत्रालयात लाचखोरीत क्लर्क सापडला, आता बडा अधिकारी अडकणार? कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला?

mantralaya clerk bribe case : लाचखोरीत मंत्रालयात क्लर्क सापडला. त्याच्यानंतर आता आणखी बडे अधिकारी अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
clerk bribe case update
mantralaya clerk bribe caseSaam tv
Published On
Summary

अन्न व औषध प्रशासन विभागात ३५ हजारांची लाच प्रकरणी मोठी अपडेट

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचत राजेंद्र ढेरंगे रंगेहाथ सापडला

एसीबीकडून कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद

महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात एसीबीने सापळा टाकून क्लर्कला अटक केली. ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या कारकुनाला आज शुक्रवारी कोर्टात हजर केलं. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संबंध तपासला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाच प्रकरणात बडा अधिकारी देखील अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 35 हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून राजेंद्र ढेरंगे याला काल अटक केली. मेडिकल दुकानाचे लायसन्स रद्द करू नये या कामासाठी ही रक्कम घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच्याविरोधात संबंधित प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सरकारी वकिलांकडून न्यायालयात एसीबी कोठडीची मागणी करताना आरोपीची मालमत्ता तपासणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का, या चौकशीची मागणी केली. तसेच आवाजाचा नमुना (व्हॉईस सॅम्पल) तपासणीसाठी ताबा आवश्यक असल्याचे सांगितले.

clerk bribe case update
पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद; बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी वर्तुळात खळबळ

आरोपीचे वकील अ‍ॅड. डी. एस. जांबुलीकर यांनी या मागणीला विरोध केला. लाचेची रक्कम जमा करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध हा वैयक्तिक भाग आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आवाज नमुना तपासणीसाठी कधीही बोलावता येते, त्यासाठी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे मत त्यांनी न्यायालयात मांडले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावली आहे. सोमवारी पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

clerk bribe case update
ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची वादळी खेळी; टीम इंडियाने नामिबियाला धूळ चारली, सुपर-8 मध्ये मिळवलं स्थान

मंत्रालयातील कोणत्या विभागात प्रकार घडला?

मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागात क्लर्कला रंगेहाथ पकडलं. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात ढेरंगे लिपिक म्हणून काम पाहतो. राजेंद्र ढेरंगे याच्या सोबत या प्रकरणात आणखी नावे निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे ACB तपासासाठी जास्तीत जास्त कोठडीची मागणी करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com