
'पुष्पा 2' नावाचं वादळ थांबताना दिसत नाहीये. 'पहली एंट्री पर इतना बवाल नहीं करता जितना दूसरी एंट्री पर करता है' या संवादाप्रमाणेच या चित्रपटाच्या वादळाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढलेत. अल्लू अर्जुनचा चित्रपटाने अवघ्या 8 दिवसांत बड्या सुपरस्टार्सला मागे सारलंय. 'पुष्पा 2' हा 2024 सालचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलाय. यापूर्वी हा विक्रम प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'च्या नावावर होता, मात्र आता अल्लू अर्जुनने हा विक्रम आपल्या नावावर केलाय.
आठव्या दिवशी कलेक्शनमध्ये घसरण झाली असूनही हा हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. चित्रपट प्रदर्शित होऊन साधरण आठ दिवस झाले आहेत. तरीही या चित्रपटाची क्रेझ कमी होताना दिसत नाहीये. नेमकं काय आहे कारण? एका तस्करी करणाऱ्या चोराच्या कथानकासाठी चाहते इतके उत्सुक का आहेत? काय आहे चित्रपटातील अस्सल मसाला? मसाला चित्रपट असून चाहत्यांना इतका आवडू लागलाय, हे आपण आज या लेखात जाणून घेऊ.
पुष्पा द राइज या पहिल्या भागात पुष्पा राज (अल्लू अर्जुन) आणि श्रीवल्ली (रश्मिका मंधाना) यांची स्टोरी पुढे जाताना दिसते. या दोघांचं लग्न झालंय. त्याचबरोबर दुसऱ्या बाजुला पहिल्या भागात पोलीस अधिकारी एसीपी भैरवसिंग शेखावतची आणि पुष्पाची लढाई सुरू झाली होती. आता दुसऱ्या भागात या लढाईचा पुढचा भाग दाखवण्यात आलाय. या भागात पुष्पा राज हा आंतरराष्ट्रीय तस्करी करणारा झाल्याचं दाखवण्यात आलंय. त्याचबरोबर त्याची दुश्मनी राजकीय नेत्यांशीसोबत सुरू होते.
दिल्लीतील एका मोठ्या नेत्याशी पुष्पाची दुश्मनी सुरू झालीय. आता पुष्पाराज आणि राजकीय नेत्यासोबत त्यां वैर कसं सुरू झालं. त्याच्या आईला आणि त्याला कुटुंबाचं नाव मिळालं का? या प्रश्नाची उत्तर पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावं लागेल आणि हो, चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पुष्पाची स्टोरी अजून पुढे चालू आहे, म्हणजे पुष्पा सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याची अधिकृत घोषणा दुसरा पार्ट संपतानाच दिग्दर्शकाने केलीय.
चित्रपट पाहून प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतात तेव्हा या चित्रपटातील काही डायलॉग आपल्या डोक्यात घेऊनच बाहेर येतात. पहली एंट्री पर इतना बवाल नहीं करता जितना दूसरी एंट्री पर करता है, फ्लाअर नही वाईल्ड फायर है मैं हे डॉयलॉग अनेकांच्या तोंडी बसतात. ज्या पद्धतीने या चित्रपटातील डॉयलॉग ठेवण्यात आलेत, चित्रपट ही त्याच पद्धतीने बनलाय.
हा चित्रपट फुलऑन मसाला मनोरंजन करणारा आहे. प्रत्येक सीनमध्ये दमदार मनोरंजन आहे. बहुतेक दुश्यांवर प्रेक्षक शिट्टी आणि टाळ्या वाजवतांना दिसतात. या चित्रपटाचा स्क्रीन प्ले, संवाद, कथा, आणि चित्रिकरण या तांत्रिक गोष्टीत उत्तम ठरलाय. चित्रपटाच्या तांत्रिक टीममधील सिनेमॅटोग्राफर कुबा ब्रोझेक मिरोस्लॉ, हा मूळचा पोलंडचा आहे. याने चित्रपटाची निर्मिती रचना खूपच रंगीत केलीय. प्रीतशील सिंगने अल्लू अर्जुनच्या गेटअप कमालीचा केलाय.
तब्बल ३ तास २० मिनिटे चालणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचलित करत नाही. तिसऱ्या चित्रपटाची घोषणेची क्लीप येईपर्यंत प्रेक्षक आपल्या खुर्चीवर बसवून ठेवण्यात दिग्दर्शक सुकूमार यशस्वी झालेत. सुकुमार यांचे लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही गोष्टी उत्कृष्ट झाल्या आहेत. स्वॅग आणि मनोरंजन या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले तेच प्रेक्षकांना भावलंय. प्रेक्षकांना पुष्पा २ मध्ये काय बघायला आवडेल हे दिग्दर्शक सुकूमार यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलं.
तेच त्यांनी पडद्यावर दाखवलं, त्याची कमाल म्हणून आज आठवडा पूर्ण झाल्यानंतरही चित्रपटाची क्रेझ कमी झाली नाहीये. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी सामान्य चंदन तस्कारची कथेसह सब प्लॉट म्हणजेच साईड स्टोरी देखील चांगल्या पद्धतीने सादर केलीय. दोन्ही कथा एकमेकांना उत्कृष्टपणे जोडल्या आहेत. कुळनाव नाव मिळावं यासाठी पुष्पाराज याची चालू असलेल्या आपल्या भावासोबतची कौटुंबिक लढाईही दिग्दर्शकांनी चांगल्या प्रकारे रंगवलीय.
अल्लू अर्जुनने पुष्पा या दोन्ही चित्रपटात दमदार अभिनय केलाय. त्याच जोडीला रश्मिका मंधान्नाने उत्तम अभियन केलाय. दोघांचा डान्स प्रेक्षकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाचवण्यासाठी भाग पडतं. काली माँ, फीलिग्स या दोन्ही गाण्यात रश्मिका आणि अल्लू अर्जुनने जबरदस्त डान्स केलाय. हा डान्स पाहून तुम्ही पैसा वसूल झाला असं म्हणाल. चित्रपटातील जत्रेच्या सीनमध्ये सलग दोन गाणी आहेत. यात अल्लू अर्जुनने देवीचं रुप घेऊन तांडव नृत्य केलंय. हा या चित्रपटाचा सर्वात सुपर सीन ठरलाय.
गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीत साउथ चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळतोय. तुलनेने बॉलिवूड चित्रपट सरासरीचा व्यवसाय करत डब्यात बंद होत आहेत. यावर अनेक सिने समीक्षक तरुण आदर्श आणि कोमल नाहटा यांनी अनेकवेळा आपली प्रतिक्रिया दिलीय. साउथ चित्रपट हे सामान्य लोकांची कहानी वाटते.
तर बॉलिवूडमधील अनेक चित्रपट हे काही शहरांची कहाणी सांगणारे असतात. त्यामुळे त्यांना अनेक प्रेक्षक नाकारतात. त्या उलट साउथ सिनेमे ठरतात. त्याचमुळे ते सर्वाधिक कमाई करतात. बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, निर्माते आहेत, जे जास्त जोखीम घेण्यास तयार नसतात. तर साउथ निर्माते आणि दिग्दर्शक हे जोखीम घेण्यास तयार असतात. जितकी जास्त जोखमी तितकी जास्त नफा अशा सुत्राने ते चित्रपटांची निर्मिती करत असतात.
बॉलिवूडमधील लोक हे आपल्या आखलेल्या चौकटीतच राहण्याचा प्रयत्न करतात, असं मत सिनेसमीक्षक तरुण आदर्श यांनी एका मुलाखतीत मांडले आहे. साउथ चित्रपटाचे दिग्दर्शक हे वेगवेगळ्या प्रकारे कथेची मांडणी करतात. पुष्पा चित्रपट हिट ठरण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कथा. दिग्दर्शक सुकूमार यांनी एका रक्तचंदन तस्कराची कथा उत्तम प्रकारे मांडलीय. बॉलिवूडमधील अनेक स्टार हे भूमिकेला न्याय देत नाहीत. पात्राला अनुरुप असलेल्या व्यक्तीरेखा ते तयार करत नाहीत. त्यासाठी पुरेशी मेहनत घेत नसल्याने ते प्रेक्षकांना भाव नसल्याचं कोमल नाहटा म्हणतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.