
Allu Arjun Arrested : सध्या पुष्पा २ चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असताना अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाल्याची बातमीने पुष्पाच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. पण नक्की कोणत्या कारणामुळे पुष्पा फेम अल्लू अर्जूलाटक करण्यात आली? काय आहे नक्की संध्या थिएटरच प्रकरण याबद्दल साविस्तर माहिती जाणून घेऊयात.
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनवर पोलिसांनी गुरुवारी दुपारी मोठी कारवाई केली आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला ताब्यात घेत अल्लू अर्जुनची चौकशी सुरू आहे, माहिती नुसार, अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले, जिथे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली...
४ डिसेंबर रोजी पुष्पा २ या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी तेलगू चित्रपट स्टार अल्लू अर्जुन याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत एम रेवती नावाच्या ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना प्रीमियरमध्ये चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती, ज्यामुळे अचानक चित्रपटातील कलाकार आल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
पोलीस काय म्हणाले
एफआयआर दाखल करताना हैदराबाद पोलिसांचे सेंट्रल झोनचे पोलिस उपायुक्त अक्षांश यादव यांनी दिलेल्या माहिती नुसार, "मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, बीएनएस कलम १०५ (दोषी हत्येची शिक्षा) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे यादव म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. लवकरच थिएटरमधील गोंधळाच्या परिस्थितीला जबाबदार असलेल्या सर्वांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
अल्लू अर्जुनने केली मृत महिलेच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत...
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. बुधवारी रात्री ९.३० वाजता पुष्पा २: द रुलच्या प्रीमियरदरम्यान एम रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला.अल्लू अर्जुनने X वर एक व्हिडिओ पोस्ट करून या घटनेचा उल्लेख केला आणि दु:ख व्यक्त केले. अल्लू अर्जुनने लिहिले की, "संध्या थिएटरमधील दुःखद घटनेने खूप दु:ख झाले आहे. या कठीण प्रसंगी माझ्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करतो. मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की ते त्यांच्या दुःखात एकटे नाहीत आणि मी वैयक्तिकरित्या कुटुंबाला भेटेन.मी त्यांच्या या कठीण प्रवासात सोबत आहे. तसेच,अल्लू अर्जुनने सदिच्छा म्हणून मृत महिलेच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.