
Pushpa 2 : पुष्पा २ द रुल या चित्रपटाच्या चर्चानां उधाण आले असून बॉक्स ऑफिसवर रश्मिका मंदान्नाची जादूही वाढत आहे. एकीकडे पुष्पाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर, दुसरीकडे पुष्पाची श्रीवल्ली तिच्या चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. श्रीवल्लीचा डान्स नंबर सामी आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या गाण्यावर श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्नाने जबरदस्त डान्स केला आहे. खरंतर रश्मिका मंदान्नाचा डान्समध्ये काही कमी नाही. पण नृत्यविश्वाचा राजा बाबू समोर उभा असताना श्रीवल्लीला आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.
सत्यम भारती नावाच्या हँडलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्सचा आहे. व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हा कुठल्यातरी रिॲलिटी शोचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि गोविंदा दोघेही स्टेजवर एकत्र आहेत. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना तिच्या सामी या हिट गाण्यावर डान्स करतेय. मग ती गोविंदालाही तिच्यासोबत हा डान्स करण्यासाठी बोलावते आणि तिच्या बोलवण्यामुळे गोविंदाही तिच्यासोबत नाचू लागतो.
रश्मिका मंदान्ना झाली आश्चर्यचकित
आता नाचण्याचा प्रसंग आला तर गोविंदासमोर कोण उभं राहिल? गोविंदा रश्मिकाच्या स्टेप बघून लगेच अगदी रश्मिका मंदान्नासारखा डान्स करू लागला. त्याने रश्मिका मंदान्नासोबत सामी गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्सही केल्या. गोविंदाने हा डान्स इतका छान केला की रश्मिकाही थक्क झाली. सामी हे गाणे पुष्पा वन द राइज या चित्रपटातील आहे. यानंतर रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुनची जोडीही पुष्पा टू द रुलमध्येही एकत्र दिसत आहे या चित्रपटाला चाहत्यांकडून भरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे.
पुष्पा २ ची मोठी कॉन्ट्रोव्हर्सी
पुष्पा २ या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैद्राबाद येथील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुन अचानक आल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला. या प्रकरणात अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करत कनिष्ठ न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली मात्र सायंकाळी तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला अंतरिम जामीना मंजूर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.