
Allu Arjun Arrested : सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी अचानक आल्याने झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने अभिनेत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात अभिनेत्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. आता अल्लू अर्जुनला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला. अल्लू अर्जुनला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, "केवळ तो अभिनेता आहे म्हणून त्याच्यासोबत असे करता येणार नाही."
संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आपण कोणत्याही प्रकारे जबाबदार नसल्याचे अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत याचिकेत म्हटले की, संध्या थिएटरने अभिनेत्याच्या आगमनाची माहिती दोन दिवस अगोदर पोलिसांना दिली होती. थिएटर व्यवस्थापनाकडून जादा सुरक्षेचीही मागणी करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही.
अल्लू अर्जुनच्या वकिलाने उच्च न्यायालयात दावा केला की, अभिनेत्याची अटक केवळ खळबळ उडवण्यासाठी होती, परंतु त्याची गरज नाही. सुनावणीत न्यायाधीशांनी बीएनएसच्या कलम १०५(बी) आणि ११८ अंतर्गत अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का, अशी विचारणा केली. घडलेल्या घटनेला तो जबाबदार आहे का? असा सवाल देखील सरकारी वकीलांना न्यायालयाने केला.
दरम्यान, चेंगराचेंगरीत ठार झालेल्या महिलेच्या पतीने केस मागे घेण्यास तयार असल्याचे सांगितले. रेवतीच्या पतीने सांगितले की, "असे काही होईल याची त्याला कल्पना नव्हती. आम्ही अभिनेत्यावरील केस मागे घेण्यास तयार आहोत.चेंगराचेंगरीत माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याच्या घटनेशी त्याचा काहीही संबंध नाही. " या महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच अभिनेता अल्लू अर्जुननेही शोक व्यक्त केला होता. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन २५ लाखांची मदत करण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.