Raj Kapoor 100th birth anniversary : राज कपूर हे चित्रपटसृष्टीतील एक अविभाज्य भाग आहेत. त्यांनी अनेक अजरामर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आज १२ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची जन्मशताब्दी आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज कपूर त्यांच्या सुंदर आठवणींना त्यांचे ज्येष्ठ पुत्र अभिनेते दिग्दर्शक निर्माते रणधीर कपूर यांनी उजाळा दिला.
एका मुलाखती दरम्यान रणधीर कपूर, राज कपूर हे जेवढे उत्तम दिग्दर्शक होते तितकेच प्रेमळ वडील आणि आजोबा देखील होते. राज कपूर यांना त्यांच्या कामाच्या धावपळीतून जसा वेळ मिळायचा तसे, त्यांच्या मुलांसोबत अधिकतर वेळ ते घालवत असत, असे रणधीर कपूर यांनी राज कपूर यांच्या जन्मशताब्दीच्या आधी आपल्या वडिलांचे स्मरण करताना म्हटले.
रणधीर कपूर पुढे म्हणले, १९७१ मध्ये वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या "कल आज और कल" या चित्रपटाचे दिग्दर्शन मी केले. या चित्रपटात कपूर कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकत्र काम केले आहे. मला माझ्या वडिलांची दररोज आठवण येते. मी "राज कपूरचा मुलगा असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. आजही आम्ही त्यांची आठवण काढतो.
ते एक प्रेमळ वडील होते. त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते. खऱ्या आयुष्यात ते खूप साधे होते. ते अगदी सामान्य वडिलांसारखेच होते. ते बऱ्याचदा कामात अडकलेले असायचे पण जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते आमच्यासोबत वेळ घालवत असत आणि आम्हाला माटुंगा येथील त्यांच्या आवडत्या डोसा सेंटरमध्ये जेवायला घेऊन जायचे. असे पुढे ७७ वर्षीय रणधीर कपूर म्णाले.
रणधीर कपूर त्यांच्या वडिलांच्या "आवारा", "श्री ४२०" आणि "जिस देश में गंगा बहती है" या चित्रपटांची आठवण करून देत पुढे म्हणाले, चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी शैली होती. ते नेहमी काळाच्या पुढचा विचार करायचे. त्यांनी चित्रटाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आवाज दिला. ते एक उत्कृष्ट आणि उत्साही हे व्यक्तिमत्व होते. "चित्रपट निर्माता; अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून त्याचे काम आजही मला खूप आवडते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.