Alia - Ranbir : आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची जादू , राहाच्या क्यूट स्टाइलने जिंकली मनं ! पहा Photo

Alia Bhatt Post : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी थायलंडमध्ये त्यांचे नवीन वर्षाचे स्वागत केले, आलियाने तिच्या सुट्टीतील सुंदर आठवणींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
alia bhatt ranbir kappor and raha kapoor
alia bhatt ranbir kappor and raha kapoorGoogle
Published On

Alia Bhatt Post : बॉलिवूडचे प्रसिद्ध पॉवर कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी नुकतीच थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय केली. या कपलने मुलगी राहा, परिवार आणि मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. आलियाने तिच्या सुट्टीदरम्यान तयार केलेल्या सुंदर आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या करत 2025 हे वर्ष प्रेम आणि करियर बाबत सुखकर असो अशी प्रार्थना केली आहे.

नवीन वर्षाचे स्वागत

ख्रिसमसनंतर, बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या हॉलिडे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. आलिया आणि रणबीर देखील नवीन वर्षाच्या आधी थायलंडला गेले होते, जिथे त्यांनी आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवला. 2 जानेवारी रोजी आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या सुट्टीतील सुंदर क्षणांची झलक शेअर केली. त्याने लिहिले, “2025: जिथे प्रेम पुढे जाते बाकी सर्व काही त्यानंतर असते... !! सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.”

alia bhatt ranbir kappor and raha kapoor
Ankita Walawalkar : 'माझं नाव वापरलेलं मला आवडणार...' ; त्या पोस्टवरून चिडली कोकण हार्टेड गर्ल, वाचा काय आहे प्रकरण ?

सुंदर आठवणींची एक झलक

आलियाच्या पोस्टची सुरुवात तीन लोकांच्या सुंदर फोटोने होते.ज्यामध्ये रणबीर कपूर आलियाला किस करतो, तर राहा कॅमेऱ्याकडे बघत हसत आहे. यानंतर एका फोटोत राहा तिची आई आलियासोबत आकाशाकडे पाहत आहे.

alia bhatt ranbir kappor and raha kapoor
Amitabh Bachchan : 'संपूर्ण देश त्यांना फक्त भारतीय...' ; अमिताभ बच्चन यांनी वाहिली देशाच्या 'महानायकांना' श्रद्धांजली, PHOTO व्हायरल

त्यानंतर आणखी एक व्हिडीओ देखील आलिया भट्टने पोस्ट केला आहे. ज्यामध्ये आलिया हिरव्यागार शहरात सायकल चालवताना दिसत आहे. तसेच, क्रूझवर सूर्यास्त पाहताना तिचा आणि राहा रणबीरचा फोटो चाहत्यांना आवडत आहे. आलियाच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे की शाहीन भट्ट, सोनी राजदान, नीतू कपूर आणि अयान मुखर्जी देखील या फोटो आणि व्हिडिओंमध्ये दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com