Ajit Pawar Biopic : माझा बायोपिक निघाला तर...'; अजितदादांनी स्वतःच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव, पाहा VIDEO

Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अलिकडेच निधन झाले. निधनानंतर त्यांच्या बायोपिकची चर्चा पाहायला मिळत आहे. कोणता अभिनेता त्यांची भूमिका साकरणार, जाणून घेऊयात.
Ajit Pawar Biopic
Ajit Pawar Biopic
Published On
Summary

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

अजित पवारांच्या निधनानंतर कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडिया अजित पवारांचा बायोपिकची चर्चा पाहायला मिळते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे. अजित पवार यांचे (28 जानेवारी 2026) निधन झाले आहे. अजित पवार यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टी देखील हदरली आहे. सध्या सोशल मीडियावर अजित पवारांच्या बायोपिकची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

व्हायरल व्हिडीओ 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' या कार्यक्रमाचा आहे. अवधूत गुप्तेनं अजित पवार यांना विचारलं की, 'अजित पवार नावाचा बायोपिक झाला, तर कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका करावी असं तुम्हाला वाटतं?' त्यावर अजित पवार म्हणाले की, "डॉक्टर निलेश साबळेनं करावा असं वाटतं..."

आता खरंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बायोपिक येणार का? कोण भूमिका साकारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निलेश साबळे याने आजवर आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांची मते जिंकली आहे. त्यावर निलेश साबळे म्हणाला की, "मी करायचो, हे लोकांना आवडायचे. पण मला माहित नव्हते की, दादा स्वतः बघतात. पण, आता मला स्वतःला कळले आहे. त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे."

शेवटी अजित पवार म्हणाले की, "मी पण कधी काय बोलतात ते बघत असतो. आम्ही आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नसतो. आमच्या एकदा माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु ह्यांनी बऱ्याचदा 'या ठिकाणी, या ठिकाणी' मी तेव्हापासून ठरवलं की, हा शब्द कमीत कमी वापरावा, तुम्ही बघा त्यानंतरच्या काळात हा शब्द अजित पवारने कमी केलेला आहे. 'डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्यातून मलाही कळेल, आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य, मला दुरुस्ती करता येईल"

Ajit Pawar Biopic
Marathi Actress : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण? पाहा रोमँटिक PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com