

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून राजकीय वातावरण तापलं.
शरद पवार गट विलिनीकरणासाठी आग्रही असल्याचा दावा.
अजित पवार गटाकडून विलिनीकरणाला तीव्र विरोध.
सुशील थोरात , साम प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विलिनीकरणावरून राजकारण तापलंय. शरद पवार गट विलिनीकरणासाठी आग्रही आहे, दुसरीकडे अजित पवार गटाकडून त्याला विरोध केला जातोय. अजितदादांच्या निधनाला काही तास उलटत नाही तोच, शरद पवार गटाकडून विलिनीकरणाकडून चर्चा सुरू झाली होती, हे चुकीचं असल्याची टीका अजित पवार गटाने केली आहे.
ज्या लोकांना अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी विरोध केला तेच आता विलिनीकरणाचीच चर्चा करत आहे, अशी टीका अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप केली आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला कडाडून विरोध दर्शवलाय. अजितदादांच्या दुर्दैवी निधनाला काही तास झाले नाही तोच शरद पवार गटाकडून विलिनीकरणाच्या चर्चा करणे दुर्दैवी असल्याचं जगताप यांनी म्हटलंय. हे चुकीचं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील इतकी परिपक्व माणसांनी अशी चर्चा करणं चुकीचं असल्यास संग्राम जगताप यांनी म्हटलंय.
अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये बारामती येथे दोन्ही पक्षांचे विलिनीकरण करण्यासंदर्भात बैठक झाल्याचे व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेत. मात्र या बैठकीचा विलिनीकरणाशी कसलाही संबंध नसल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय, अशा बैठका होत असतात त्याचा अर्थ विलिनीकरणासंदर्भात घेण्याचे कारण नाही जर विलिनीकरणासंदर्भात बैठक झाली असती तर पक्षातील कोणालातरी याची माहिती असती असं काहीही नाही, असं आमदार जगताप यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या मागे असलेल्या इतर आमदारांना विलिनीकरणाच्या चर्चांबाबत माहिती राहिली असती असा दावा संग्राम यांनी केलाय.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरणाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप म्हणालेअजितदादांची 2004 साली मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असताना देखील ती पूर्ण केली गेली नाही. त्यात काही जणांनी उलट सुलट चर्चा केल्या, तीच लोक आता अजितदादाची इच्छा असल्याचे सांगत असल्याचं आमदार जगताप यांनी म्हटलंय.
दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत विलिनीकरणावरून वादविवाद सुरू झालेत. येत्या 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची घोषणा होणार होती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणावर स्पष्टपणे भाष्य केले. गेल्या चार महिन्यांपासून या विषयावर चर्चा सुरू असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार हे दिसत आहेत. यावर बैठकीबाबत खासदार सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. व्हायरल झालेला व्हिडीओ बारामतीला कृषी प्रदर्शनावेळी चहापानाचा आहे. या बैठकीनंतर स्वतः अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात चर्चा झाल्याची माहिती दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.