Sachin Pilgaonkar: 'तुझ्या करिअरची ५० वर्षे...'; सचिन पिळगावकर करणार सुबोध भावेच्या आयुष्यावर बायोपिक, नेमकं काय म्हणाले?

Sachin Pilgaonkar on Subodh Bhave: मराठी सिने-मनोरंजनविश्वात सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. सुबोध भावे यांचा 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकर यांनी केलेलं विधान तुफान व्हायरल होत आहे.
Sachin Pilgaonkar on Subodh Bhave
Sachin Pilgaonkar on Subodh BhaveSaam Tv
Published On
Summary

सुबोध भावेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील सचिन पिळगांवकरांचे भाषण व्हायरल

सचिन यांनी सुबोधच्या २५ वर्षांच्या अभिनय प्रवासाचे कौतुक केले

सचिन भविष्यात सुबोध भावेच्या आयुष्यावर बायोपिक करणार

Sachin Pilgaonkar On Subodh Bhave: मराठी सिने-मनोरंजनविश्वात सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी सुबोध भावेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास स्टाईलमध्ये प्रसंग केली हे कौतुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुबोध भावे यांचा नुकताच 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मोठं सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं. या सेलिब्रेशनमध्ये राज ठाकरे, सचिन पिळगांवकरांसह अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी सचिन पिळगांवकर यांनी सुबोधला खास भाषणात शुभेच्छा दिल्या.

Sachin Pilgaonkar on Subodh Bhave
Actor Father Passes Away: बिग बॉस फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; सोशल मीडियावर व्यक्त केली वेदना

सचिन पिळगावकरांनी सुबोध भावेला शुभेच्छा देत म्हणाले, सुबोध, तू करिअरची केवळ 25 वर्ष पूर्ण केली आहेस, तुला आणखी काम करायचे आहे. तुझ्या करिअरची 50 वर्ष जेव्हा होतील, तेव्हा तुझी दोन्ही मुलं मोठी झालेली असतील. मी तुझ्या दोन्हीपैकी एका मुलावर बायोपिक करेन आणि प्रमुख भूमिकेसाठी मी तुलाच निवडेन. तू तेव्हाही तितकाच लोकप्रिय असशील.

Sachin Pilgaonkar on Subodh Bhave
Upcoming Film: PM मोदींच्या भूमिकेत हा सुपरस्टार दिसणार; तर रवीना टंडन साकारणार आईची भूमिका, सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

सचिन पिळगावकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले, त्याचा बायोइपिक मध्ये त्याच्या आजोबा चा रोल पण तुम्ही च करणार वाटतं. आणखी एकाने लिहीले, तुम्ही दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com