Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan Separation Rumors
Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan Separation RumorsSaamtv

Aishwarya - Abhishek Separation Rumors: ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनमध्ये दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा

Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan News: ऐश्वर्या – अभिषेकमध्ये काही तरी बिनसलं आहे, अशी सर्वत्र चर्चा होत असताना ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले.
Published on

Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan Separation Rumors

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कपल चाहत्यांचे सर्वाधिक आवडतं कपल. या कपलची नेहमीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. सध्या सोशल मीडियावर या कपलमध्ये काही तरी बिनसलं असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

दोघांमध्ये काही तरी बिनसलं आहे, अशी सर्वत्र चर्चा होत असताना ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले. तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे ऐश्वर्या- अभिषेकमध्ये, दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan Separation Rumors
Amitabh Bachchan And Shweta Nanda News: अमिताभ बच्चन यांनी जुहूमधील 'प्रतिक्षा' बंगला दिला लेकीला गिफ्ट, किती आहे बंगल्याची किंमत?

नुकतंच ऐश्वर्याने दिवगंत वडील कृष्णराज राय यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, ऐश्वर्या, लेक आराध्या आणि वडील कृष्णराज राय सुद्ध दिसून येत आहे. पण त्या फोटोमध्ये अभिषेक दिसत नसल्यामुळे नेटकऱ्यांनी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हणत आहे. (Bollywood)

‘आम्ही नेहमीच तुमच्यावर प्रेम करत राहु. डिअरेस्ट डिअर डॅडी अज्जा. मोस्ट लव्हिंग, खूप काळजी घेणारा, स्ट्रॉन्ग, तुमच्यासारखा कोणीच नाही... तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! तुमच्या स्मरणार्थ प्रार्थना तुमची खूप आठवण येतेय.’ अशी पोस्ट अभिनेत्रीने केली आहे. (Social Media)

ऐश्वर्याच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या पोस्टवर अनेक युजर्सने तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय का?, असा प्रश्न विचारला आहे. 'डियर ऐश... तू केव्हाच आराध्या आणि अभिषेकसोबत फोटो का काढत नाहीस... तुमचे एकत्र फार कमी फोटो आहेत. त्यामुळे तुम्ही वेगळे झाला आहात का?' अशी कमेंट एका युजरने केली आहे.

अशा आशयाच्या अनेक कमेंट्स युजर्सने केल्या आहेत. एबीपी न्यूजने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या यापूर्वीही चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी सुद्धा ऐश्वर्या आणि अभिषेकने कोणतीही कमेंट केलेली नव्हती आणि यावेळी देखील कमेंट केलेली नाही. (Bollywood News)

Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan Separation Rumors
Mansoor Ali Khan-Trisha Krishnan Controversy: ‘मी तिच्या लग्नाला जाणार आणि...’ त्रिशाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंसूरचा माफीनामा
Aishwarya - Abhishek Separation Rumors
Aishwarya - Abhishek Separation RumorsInstagram

ऐश्वर्या बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियन सेल्वन’ आणि ‘पोन्नियन सेल्वन २’मध्ये शेवटची दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटातून दिसली नाही. तर अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘दसवी’, ‘भोला’ आणि ‘घुमर’मध्ये दिसला होता. त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटामध्ये दिसला नाही. ‘घुमर’मध्ये साकारलेल्या प्रशिक्षकाच्या भुमिकेने त्याचे सर्वच स्तरामध्ये कौतुक झाले होते.

Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan Separation Rumors
1234 Teaser Out: होती खरं लव स्टोरी..पण गडबड झालीये थोडी!, 'एक दोन तीन चार'चा धमाकेदार टिजर रिलीज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com