Aaradhya Bachchan Case: अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनने दिल्ली हायकोर्टात दाखल केली याचिका, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Aaradhya Bachchan File Complaint In HC: आराध्या बच्चनने युट्यूब चॅनल आणि एका वेब साईटवर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला आहे.
Aaradhya Bachchan File Complaint In HC
Aaradhya Bachchan File Complaint In HCInstagram @aishwaryaraibachchan_arb
Published On

Aaradhya Bachchan File Complaint Against YouTube Channel: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय यांचा दबदबा आहे. बच्चन कुटुंब अनेकदा एकत्र पाहायला मिळत. या कुटुंबाची नेहमीच चर्चा असते, कधी जया बच्चनमुळे तर कधी खुद्द 'बिग बीं'मुळे.

जया आणि अमिताभ यांची मुलांसह नातवंडे देखील चर्चेत असतात. या कुटुंबातील सर्वांत लाडकी म्हणजे आराध्या बच्चन. अलीकडेच, बच्चन कुटुंबाने एका यूट्यूब चॅनलवर आराध्याच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती शेअर केल्याचा आरोप केला आहे.

आराध्या बच्चनने दोन यूट्यूब चॅनल आणि एका वेब साईटवर तिच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला असून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Aaradhya Bachchan File Complaint In HC
Sari Trailer: आयुष्याची प्रेमळ व्याख्या सांगणाऱ्या ‘सरी’चा ट्रेलर प्रदर्शित

या याचिकेवर २० एप्रिल म्हणजेच गुरुवारी सुनावणी होणार आहे. तिच्या आरोग्याबाबत आणि पब्लिक अॅपिरियन्सबाबत काही साइट्सवर विविध गोष्टी पसरवण्यात आल्या होत्या. आता १२ वर्षीय आराध्याने यावर याचिका दाखल केली असून लवकरच या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

आराध्या बच्चन अवघ्या १२ वर्षांची असून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबतची आराध्याची बाँडिंग खूप खास आहे. आराध्या नेहमीच आई ऐश्वर्या राय सोबत दिसते.

ऐश्वर्या राय बच्चनने २००७ मध्ये अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या जीवनात २०११ साली आराध्या आली.

आराध्या १२ वर्षांची असून बच्चन कुटुंबाचा जीव आहे. आई ऐश्वर्या व्यतिरिक्त आराध्याचे तिचे आजोबा म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबतही खास बॉन्डिंग आहे.

आराध्य नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उदघाटन सोहळ्यादरम्यान ट्रोल झाली होती. तिची हेअर स्टाईल गेली अनेक वर्ष तशीच आहे, असे म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com