मराठी सिनेरसिकांसाठी एकापाठोपाठ एक जबरदस्त मेजवाणी मिळत आहे. आजच 'झिम्मा २' चित्रपट (Jhimma 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानंतर आता आणखी एक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'एक दोन तीन चार' हा नवा चित्रपट (1234 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटामध्ये अभनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) आणि अभिनेता निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टिजर नुकताच रिलीज झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला 'एक दोन तीन चार' हा चित्रपट नव्या वर्षात म्हणजे ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीसला येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.
आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी हा चित्रपट मेजवाणी ठरणार आहे.
जिओ स्टुडिओजच्या या नव्या चित्रपटात कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे. चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामीने साकारली आहे. तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं साकारली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाच्या माध्यमातून वैदेही आणि निपुण यांची नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे. जिओ स्टुडिओज बरोबर या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.