Malaika- Arjun Spot: कोण म्हणतं अर्जुन- मलायकाचा ब्रेकअप झाला?; हा घ्या पुरावा, पाहा Video

Malaika- Arjun Viral Video: अर्जुन आणि मलायकाचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाल्या होत्या. अशातच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघेही एका पार्टीवरून परतत असताना एकत्र स्पॉट झाले आहे.
Malaika- Arjun Spot Viral Video
Malaika- Arjun Spot Viral VideoInstagram

Malaika- Arjun Spot Viral Video

बी-टाऊनमधील फेमस कपल अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एक्स पती अरबाज खानपासून विभक्त झाल्यापासून मलायकाच्या आणि अर्जुनच्या रिलेशनची चर्चा होते.

मध्यंतरी ह्या कपलचं ब्रेकअप झाल्याची चर्चाही सोशल मीडियावर झाली होती. ब्रेकअपच्या चर्चे दरम्यान, हे दोघेही एका पार्टीवरून परतत असताना एकत्र स्पॉट झाले आहे. सध्या त्यांच्या पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. (Bollywood News)

Malaika- Arjun Spot Viral Video
Rakul- Jaccky Wedding: रकुल प्रीत सिंह लवकरच अडकणार विवाहबंधनात; बॉयफ्रेंडसोबत 'या' खास ठिकाणी करणार लग्न

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेक दिवसानंतर एकत्र कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघंही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही अनेकदा प्रसारित झाल्या होत्या. अर्जुनचं एका सोशल मीडिया एन्फ्लूएंसरसोबत नावही जोडलं गेलं होतं. पण या चर्चांनंतर आता हे कपल एकत्र स्पॉट झाले आहे. (Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अर्जुन आणि मलायका दोघेही कारच्या मागच्या सीटवर एकत्र बसलेले दिसत आहे. यावेळी मलायका अरोराने पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. त्यावर मॅचिंग ब्लेझरही तिने परिधान केला होता. तर अर्जुन कपूर ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट झाला होता. शुक्रवारी रात्री (२० जानेवारी) अर्जुन आणि मलायका एका पार्टीमधून बाहेर येताना स्पॉट झाली होती. (Bollywood)

Malaika- Arjun Spot Viral Video
Prasad Oak Watch Main Atal Hoo: ‘पंकज त्रिपाठी आता व्यक्ती न राहता...’ प्रसाद ओकने 'मैं अटल हूं' पाहिल्यानंतर चित्रपटाच्या स्टार कास्टचे केले कौतुक

अमृता अरोरा यांच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अर्जुन कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान, करिश्मा कपूर सह अनेक सेलिब्रिटी या पार्टीला उपस्थित होत्या. सध्या ह्या पार्टीमधले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Entertainment News)

Malaika- Arjun Spot Viral Video
Sarita Mehendale: 'भागो मोहन प्यारे' फेम अभिनेत्रीने मुलाचं ठेवलं खूपच सुंदर नाव, क्युट फोटो केला शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com