Sarita Mehendale: 'भागो मोहन प्यारे' फेम अभिनेत्रीने मुलाचं ठेवलं खूपच सुंदर नाव, क्युट फोटो केला शेअर

Sarita Mehendale Share Baby Boy Cute Photo: सरिताने आता आपल्या मुलाचं काय नाव ठेवलं हे जाहीर केलं आहे. सरिताने सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगितले आहे. तिने मुलाचे नाव खूपच छान ठेवलं आहे.
Sarita Mehendale Share Baby Cute Photo
Sarita Mehendale Share Baby Cute PhotoSaam Tv

Bhago Mohan Pyare Serial:

'भागो मोहन प्यारे' (Bhago Mohan Pyare) या मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री सरिता मेहेंदळे (Actress Sarita Mehendale) १ जानेवारी २०२४ ला आई झाली. सरिताने गोंडस मुलाला जन्म दिला. घरी नवा पाहुणा आल्यामुळे सरिताच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. सरिताने आता आपल्या मुलाचं काय नाव ठेवलं हे जाहीर केलं आहे. सरिताने सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगितले आहे. तिने मुलाचे नाव खूपच छान ठेवलं आहे.

सरिता मेहेंदळेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, सरिताने तिच्या नवऱ्याच्या हातावर हात ठेवला आहे आणि या दोघांच्या हातावर त्यांच्या गोंडस मुलाचा हात दिसत आहे. सरिताने आपल्या मुलाच्या हातामध्ये सोन्याचे ब्रेसलेट घातलं आहे. या ब्रेसलेटवर 'अन्वीत' असं नाव लिहिलं आहे. या फोटोच्या माध्यमातून सरिताने आपल्या मुलाचे नाव जाहीर केलं आहे.

मुलाचे नाव जाहीर करत सरिताने शेअर केलेल्या फोटोला सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने असे लिहिले की, 'New Love Of Our Livee. My tiny Miracle. Anvit' या पोस्टमध्ये सरिताने हार्ट इमोजी पोस्ट करत आपल्या चिमुकल्या मुलाप्रती प्रेम व्यक्त केले आहे. सरिताच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून त्यांनी मुलाचं नाव खूप छान ठेवले असल्याचे देखील म्हटले आहे.

दरम्यान, सरिताने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बाळाचे स्वागत केले. १ जानेवारी २०२४ ला सरिताने गोंडस मुलाला जन्म दिला होता. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने 'इट्स आ बॉय' असे लिहिलेले लहान मुलाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे नवीन वर्ष भरभरून आनंद घेऊन आले आहे !! 01.01.2024 ला छोट्याचं स्वागत आहे.' यासोबतच तिने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. सरिताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह काही सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिया खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Sarita Mehendale Share Baby Cute Photo
Salaar OTT Release Date: 'हिंदीवाल्यांशी वैर आहे का?', ओटीटीवर 'या' दिवशी रिलीज होणार 'सालार', पण प्रभासचे चाहते नाराज

सरिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण 'भागो मोहन प्यारे'या मालिकेतील मधुवंती या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. या मालितून ती घराघरामध्ये पोहचली. सरिताने 'सरस्वती' या मालिकेतून आपल्या मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.

Sarita Mehendale Share Baby Cute Photo
Rashmika Mandanna: 'मी रडत होते, ओरडत होते...', 'अ‍ॅनिमल'मधील 'या' सीननंतर रश्मिका झाली होती खूपच इमोशनल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com