साऊथ सुपरस्टर प्रभासचा (South Superstar Prabhas) ब्लॉकबस्टर चित्रपट 'सालार : पार्ट वन - सीझफायर' (Salaar: Part 1 – Ceasefire) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. सालार चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर वर्ल्ड वाइड जबरदस्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाई करत काही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पाहू न शकलेल्या प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
सालार चित्रपट आता त्यांना घरी बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता सालार चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्याची रिलीज डेट समोर आली आहे. पण प्रभासच्या हिंदी भाषिक चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण हा चित्रपट हिंदी वगळता इतर ४ भाषांमध्ये ओटोटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
बॉक्स ऑफिसनंतर आता सालार चित्रपट ओटीटीवर दार ठोठावत आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सालारच्या ओटीटीवर रिलीजच्या तारखेबाबत आतापर्यंत फक्त अंदाज बांधला जात होता. पण आता सालारच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. प्रशांत नीलचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २० जानेवारीला म्हणजेच शनिवारी प्रदर्शित होणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी त्याच्या हिंदी भाषिक चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण या चित्रपटाचा ओटीटीवरील प्रिमियर हिंदी वगळता इतर ४ भाषांमध्ये होणार आहेत.
'सलार' चित्रपटाने भारतात ४०० कोटींहून अधिक कमाई केली. हा २२ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सालारसोबत शाहरुख खानचा 'डिंकी' चित्रपट देखील रिलीज झाला होता. सालारने बॉक्स ऑफिसवर डंकीला मागे टाकत जबरदस्त कमाई केली. सालार चित्रपटामध्ये प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चित्रपट अद्याप हिंदी भाषेत उपलब्ध होणार नाही. अशा स्थितीत काही चाहत्यांनी आक्षेपही व्यक्त केला आहे. एका यूजरने 'हिंदीवाल्यांशी काही वैर आहे का?', असा सवाल करत राग व्यक्त केला आहे. दरम्यान, 'सालार'नंतर त्याचा सीक्वलही येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितले होते की, 'प्रभास आणि प्रशांत दोघेही 'सालार २' करण्यासाठी उत्सुक आहेत.' याशिवाय प्रभास 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.