Best Actress Hruta Durgule: स्वप्न सत्यात उतरले; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या हृताने मानले फॅन्सचे आभार

Zee Chitra Gaurav Puraskar 2023: पहिल्या चित्रपटासाठी हृताला 'झी चित्रगौरव २०२३'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे.
Hruta Durgule Received Best Actress Award
Hruta Durgule Received Best Actress AwardInstagram @hruta12

Hruta Durgule Received Best Actress Award: अभिनेत्री हृता दुर्गुळे अनेकांच्या मनावर राज्य करते. 'दुर्वा' या मालिकेतून हृताने टीव्ही जगतात पदार्पण केले. परंतु झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेमुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर हृताने 'मन उडू उडू' ही झी मराठीवरील पहिली मालिका केली.

अनन्या या चित्रपटातून हृताने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला 'झी चित्रगौरव २०२३'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. तर पुरस्कार मिळाल्यानंतर हृताने तिच्या भावना व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Hruta Durgule Received Best Actress Award
Siddharth Jadhav: 'हा' क्षण येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते..., अशोक मामांसाठी सिद्धूची भावनिक पोस्ट

हृताने तिच्या पोस्टमध्ये तिच्या पुरस्कारसह फोटो शेअर केला आहे. तर तिने भावना व्यक्त करत म्हटले आहे की, चित्रपटासृष्टीत तुझे स्वागत आहे: त्यांनी म्हटलं, हे कठीण आहे: त्यांनी म्हटलं, पहिलंवहिलं नेहमीच खास असतं: त्यांनी म्हटलं, आणि आज मी इथे तुम्हा सर्वांसमोर हा पुरस्कार घेऊन उभी आहे, यामुळे सर्वकाही सर्वांना सिद्ध झाले आहे!!

सर्वांसाठी: ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.. माझ्यावर विश्वास ठेवला ... मला मदत केली आणि माझ्यावर एक जबाबदारी सोपवली ज्याचा मी फक्त स्वप्नात विचार करू शकत होते: झी चित्र गौरव २०२३ अनन्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

हृताच्या या पोस्टवर सुयश टिळक, अमेय वाघ, सुव्रत जोशी, नम्रता संभेराव आणि योगिता चव्हाण यांनी कमेंट करून अभिनंदन केले आहे. तर सुव्रताने अजून पुरस्कार मिळवायचे आहेत असे देखील म्हटले आहे.

हृताचे अनेक फॅन्स देखील तिचे अभिनंदन करत आहे. तसेच तिच्या कामाचे आणि चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत आहेत.

हृताने अनन्यानंतर 'टाइमपास ३' मध्ये काम केले. तर उमेश कामतसह 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकात ती काम करत आहे. हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. ललित प्रभाकरसह हृता 'सर्किट' या चित्रपटात दिसणार आहे. ७ एप्रिलला हा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com