Breaking News: अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली बंदुकीची गोळी, रुग्णालयात दाखल

Bollywood Actor Govinda Accident News Updates: बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली. त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
Breaking News:  अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली बंदुकीची गोळी
Actor GovindaInstagram @govinda_herono1
Published On

Actor Govinda Latest Marathi Updates: बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाच्या (Actor Govinda) पायाला गोळी लागल्याची घटना घडली. स्वतःकडील बंदुक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. गोळी लागल्याने गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी झालेल्या गोविंदाला तात्काळ नजीकच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो आता सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी जुहू पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली. मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा पहाटे घराबाहेर जाण्यासाठी निघत असताना ही घटना घडली. बंदुक साफ करत असताना अचानक स्ट्रीगर दबला गेल्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. त्याला CRITI केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. गोविंदाला गोळी लागल्याचे वृत्त कळताच त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा गोविंदा घरी एकटाच होता. तो घराबाहेर जाण्याच्या तयारीत होता. यावेळी तो परवाना असलेली बंदुक साफ करत होता. बंदुक साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि पायाला लागली. जखमी झालेल्या गोविंदाने शेजारी राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना बोलावले. नातेवाईकांनी गोविंदाच्या घरी धाव घेत त्याला रुग्णालयात नेले. सध्या या घटनेवर गोविंदाचे नातेवाईक किंवा जवळच्या मित्र परिवाराकडून काहीच माहिती मिळाली नाही.

Breaking News:  अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली बंदुकीची गोळी
Bigg Boss Marathi: अभिजीतच्या 'त्या' निर्णयावर जान्हवी संतापली, रडत रडत म्हणाली, या घरातली माझी किंमत...

अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने सांगितले की, 'आम्हाला कोलकाता येथे एका कार्यक्रमासाठी जायचे होते. सकाळी सहा वाजता आमची फ्लाइट होती आणि मी विमानतळावर पोहोचलो. गोविंदाजी त्यांच्या घरातून विमानतळासाठी निघणार होते तेव्हा त्यांनी सांगितले, 'रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना ते चुकून पडले आणि त्यातून गोळी सुटली. देवाच्या कृपेने गोविंदाजींना फक्त पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर नाही.'

Breaking News:  अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली बंदुकीची गोळी
Bigg Boss Marathi: ग्रँड फिनालेपूर्वी 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात अभिजीतला मिळाली ट्रॉफी; निक्की म्हणाली, 'खुश राहा...'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com