Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Govinda And Krushna Abhishek Relation : अभिनेता गोविंद आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. नुकताच एका मुलाखतीत गोविंदाने कृष्णासोबतच्या वादामागील कारण सांगितलं आहे.
Govinda And Krushna Abhishek Relation
Govinda And Krushna Abhishek RelationSaam Tv

अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक हे मामा भाचे आहेत, अनेकांना ठाऊक आहे. पण जरीही ते मामा भाचे असले तरीही त्यांच्यातील कौटुंबिक वाद सर्वांनाच माहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांसोबत बोलत नाहीत.

नुकतंच गोविंदाची भाची आणि कृष्णाची बहिण अभिनेत्री आरती सिंहचं लग्न पार पडलं. तिच्या लग्नाला अभिनता गोविंदा उपस्थिती लावणार नाही अशी चर्चा झाली होती, पण त्याने आपल्या मुलासोबत लग्नाला उपस्थिती लावली होती.

भाचीच्या लग्नात गोविंदाने उपस्थित राहून वाद मिटल्याचे संकेत दिले होते. अशातच गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या मुलाखतीत गोविंदाने वादामागील कारण सांगितलं आहे.

Govinda And Krushna Abhishek Relation
Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

व्हायरल होत असलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, “मी आणि पत्नी सुनीता कृष्णाच्या मुलांना हॉस्पिटलमध्ये पाहायला गेलो होतो. आम्हाला त्यांच्याजवळ जाण्याचीही परवानगी नव्हती. आम्ही दोघांनीही त्यांना लांबूनच पाहिलं. त्यांना आम्ही उचलून घेण्याचाही प्रयत्नही केलेला पण आम्हाला रोखलं गेलं होतं. कदाचित इन्फेक्शनमुळे त्यांनी नकार दिला असावा, असं मला वाटतं. ही गोष्ट मी त्याला चार वेळा सांगितली की 'मी तुझ्या मुलांना भेटून आलो आहे.' पण तो ती गोष्ट मानायला तयार नाही.” अशी खंत अभिनेत्याने मुलाखतीमध्ये बोलून दाखवली आहे.

कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद सुरू झाला होता. २०१६ मध्ये कृष्णाच्या शोमध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. पण गोविंदाने कृष्णाच्या शोमध्ये उपस्थिती लावण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीराने एक ट्विट केलं होतं. ‘काही लोकं पैशांसाठी डान्स करतात’, असं तिने ट्वीट केले होते. गोविंदाची पत्नी सुनिताला असं वाटलं की हे ट्विट कश्मीराने त्यांच्या फॅमिलीसाठी केलेले आहे. या कारणामुळे कृष्णा आणि गोविंदाच्या कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

Govinda And Krushna Abhishek Relation
Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com